औरंगाबाद । वार्ताहर
लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकारण आणि विनापरवाना फिरणार्या दुचाकी व चारचाकी चालकांनावर सकाळपासूनच वाहनधारकांवर कारवाई सुरू होती. आज रेल्वे स्टेशन चौक येथे वेदांतनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोनि रामेश्वर रोडगे यांच्यासह मोहल्ला कोव्हिड कमिटी मेंबर्सच्या मुसा खान, अशरफ खान, यांच्यासह नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाहीसाठी शहर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद साहेब, झोन 1 चे पोलीस उपायुक्त खाटमोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
गुरूवारी सकाळपासूनच विनाकारण दुचाकी, चारचाकीवर फिरून आलेले वाहनधारकांवर वेदांतनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्यासह जहागीरदार कॉलनी येथील मोहल्ला कोव्हिड कमिटीचे मेंबर सोबत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तांनी कोरोना विषाणूवर लवकरात लवकर समाप्त करण्यासाठी प्रत्येक मोहल्लात एक कोव्हिड कमिटी तयारी केलेली आहे. या कोव्हिड कमिटीचे सदस्यांनी फक्त येथील नागरिकांना मदत करता येईल अशी व्यवस्था करावी कोणाला विनाकारण घराबाहेर पडू देणार नाही. नागरीकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा मोहल्ला कोव्हिड कमिटीचे सदस्य करतील तसेच नाकाबंदीत पोलीसांना मदत करतील. दररोज प्रत्येक चौकात पोलिस नाकाबंदी करून विनाकारण फिरणार्यावर कारवाई करतील असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले आहे.जहागीरदार कॉलनी मोहल्ला कोव्हिड कमिटी अशी आहे. मुसाखान मोहम्मद खान,इरफान खान ईब्राहिम खान, अशरफ खान ईस्माइल खान,शेख मोहम्मद शेख अजीज,शेख हबीब शेख यासिन हे कोव्हिड कमिटी मेंबर पोनि रामेश्वर रोडगे यांनी कमिटी तयार केली आहे.
Leave a comment