तहसीलदार प्रविण पांडे यांची सामाजिक बांधिलकी
फर्दापूर । वार्ताहर
सतत च्या लॉक डाऊन मुळे औरंगाबाद हून मध्यप्रदेशात पायी जात असलेल्या 15 मजूरांना तहसीलदार प्रविण पांडे यांनी फर्दापूर (ता.सोयगाव) येथून महामंडळाच्या बस द्वारे मध्यप्रदेश पर्यंत रवाना केले तहसीलदार प्रविण पांडे यांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकी मूळे प्रदेशातील या 15 ही मजूरांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले आहे.दि.28 गुरूवार रोजी काही मजूर औरंगाबाद हून मध्यप्रदेशात जात असल्याची व या मजूरांन मध्ये लहान बालक महिलांचा समावेश असल्याची माहिती सोयगाव चे तहसीलदार प्रविण पांडे यांना प्राप्त झाली होती.सदरील माहिती प्राप्त होताच कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या तहसीलदार प्रविण पांडे यांनी तातडीने सर्व कायदेशीर सोपोस्कार पूर्ण करुन सदरील मजूरांना फर्दापूर येथे थांबून ठेवण्याच्या सूचना त्यांच्या अख्त्यारीतील कर्मचार्यांना केल्या दरम्यानच्या काळात तहसीलदार प्रविण पांडे यांनी एस.टी महामंडळाच्या अधिकार्यांन सोबत संपर्क साधून या मजूरांन करीता महामंडळाची एक बस उपलब्ध करुन घेत या 15 ही मजूरांना फर्दापूर येथून बस मध्ये मध्यप्रदेश कडे रवाना केले.दरम्यान तहसीलदार प्रविण पांडे यांनी आपले शासकीय कर्तव्य पार पाडतांना सामाजिक बांधिलकी जपत मजूरांन साठी अत्यंत तातडीने केलेल्या उपाययोजने मूळे एकवेळ पून्हा तालूक्यातील जनतेची मने जिंकून घेतल्याचे दिसून आले.
Leave a comment