शिवना । वार्ताहर
खुपटा ता सिल्लोड येथे मंगळवार रोजी धामना धरणाच्या बुडीत क्षेत्रात *एम. आर. इ. जी. एस.* योजने अंतर्गत गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे साहेब यांच्या आदेशावरून मंजूर सार्वजनिक विहिरीचे भूमी पूजन करण्यात आले.
खुपटा परिसरामध्ये सतत तीन वर्षे पावसाळा अल्प झाल्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंच्यातिने टँकर द्वारे पाणी पुरवटा करावा लागला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे धामना धरण येथून खुपटा गावास पाणी पुरवता योजनेचे काम पूर्ण झाले. परंतु ही योजना दोन विंधन (बोरवेल) विहीरीतून पाणी पुरवठा करीत आहे . दर वर्षी उन्हाळा ऋतू मध्ये विंधन विहीरीचे पाणी आटते म्हणून गावास पाणी टंचाई सामना करावा लागतो . ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने एम. आर. इ. जी. यस. योजने द्वारे पाठपुरावा करून मा. गटविकास अधिकारी प. स. सिल्लोड यांनी मंजुरी दिल्यामुळे सदरील विहिरीच्या कामास सुरुवात होणार असून गावास कायम स्वरूपात पाणी प्रश्न निकाली निघणार असल्यामुळे ग्रामस्थ मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी ,सरपंच पदमाबाई भगवान वाघ,उपसरपंच प्रभाकर,काळे,ग्रामसेवक शशिकांत निंबाळकर ,ग्रामरोजगार सेवक पी. एम. काळे,संगणक परिचालक,विष्णू कालभिले,पोलीस पाटील शिवाजीराव काळे,ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना तालुका उपप्रमुख सुभाष करवंदे,मालनबाई काळे,गयाबाई काळे,लताबाई काळे,मीराबाई करवंदे, ग्रामस्थ - शामराव विश्राम काळे , सारंगधर काळे , उत्तमराव काळे, भगवान वाघ, माणिकराव काळे, योगेश जोशी राजु जाधव , शेषराव उबाळे , विनायक काळे, समाधान विसपुते आदि ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Leave a comment