शिवना । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील रमजान ईद( ईद-उल-फितर )लॉक डाऊनच्या छत्र छायेत मुस्लिम बांधवानी शांततेत साजरी करण्यात आली. या वर्षी कोविड 19 संसर्ग आजारामुळे संपूर्ण देशात कलम 144 लागू असून सदरील महामारीपासून वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये इस्लाम धर्मात पवित्र मानलं जाणार्या रमजान महिन्याचे विशेषमहत्व आहे.
या वर्षी कडक उन्हाळ्यात रमजान महिना आल्यामुळे मुस्लिम बांधवानी कोणतीही पर्वा न करता महिनाभर उपवास (रोजे)ठेऊन शासनाने दिलेल्या आदेशानुसार अमलबजावणी करून आप-आपल्या घरातीलच नमाज अदा, कुराण पठण व ईश्वराशी समुच्या भारतात थैमान घातलेल्या कोरोना आजारच्या खातम्यासाठी प्रार्थना केली. रमजान ईद शांततेत साजरी करण्यासाठी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी दोन-तीन दिवस अगोदरच मुस्लिम बांधवाची एक बैठक घेऊन रमजान ईद आप-आपल्या घरातच साजरी करण्याचे अहवान केले होत व एकमेकाना भेटताना पण आपण स्वतः खबरदारी घ्यावी. यांच्या अहवानाला स्वीकारून मुस्लिम बांधवानी रमजान ईद घरी राहा, सुरक्षित राहा म्हणल्यानुसार आप-आपल्या घरामध्ये ईद ची नमाज अदा करून संपूर्ण देशात शांतता रहावी यासाठी आप-आपल्या परीने ईश्वराशी प्रार्थना केले. त्या नंतर सोशल डिस्टन्स ठेऊनच एकमेकाना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. व कोरोना आपल्या देशातुनच नव्हे तर संपूर्ण जगातुन हद्दपार व्हावे अशी त्याच्या मनातल्या व्यथा त्यांनी सांगितल्या.
चौकट
अजिंठा पोलीस ठाण्याचे स.पो.नि .पोलीस किरण आहेर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सर्व मुस्लिम बांधवानी देशावरती आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी यावर्षी रमजान ईद गावापासून दूर न जाता कोरोना आजारचा फैलावला आळा घालण्यासाठीच मुस्लिम बांधवानी आप-आपल्या घरीच ईद ची नमाज अदा केली ज्यामुळे आपल्याला वेळोवेळी महसूल, आरोग्य व पोलीस विभागाने दिलेल्या सूचनाचे सर्व मुस्लिम बांधवानी सहकार्य केल्याबद्दल व सोशल डिस्टन्सचे पालन करूनच यंदाची रमजान ईद साधारण स्वरूपात साजरी करून एक चांगला संदेश दिला मी त्यांचे मनापासून आभार मानतो व ईद च्या शुभेच्छा देतो. देशात अशीच शांतता कायम राहावी असे त्यांनी दैनिक लोकप्रश्न शी बोलताना सांगितले.
Leave a comment