खुलताबाद । वार्ताहर
देशात नव्हे तर जगात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे विविध शहरातील लोक आपल्याला मूळगावी परत आहेत.यामुळे ग्रामीण भागात ही याचा शिकराव होऊ नये म्हणून पंचायत समिती खुलताबादच्या वतीने कोरोनोच्या मुक्तीसाठी प्रतिकात्मकपणे चक्क ’कोरोना’ विषयी गाडीवरून लोकांमधे जनजागृती करण्यात येणार आहे.पंचायत समितीच्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य म्हणजे संपुर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे संकटात आहे. औरंगाबादेत ही दररोज कोराना बाधीत रुग्णांची संख्या व मृत्यु वाढत चालली आहे. कोरोनावर अद्यापही कुठलीही लस वा औषध निघालेले नाही. कोरोनाला पळवुन लावायचे असेल तर घरात बसणे हाच एक रामबाण उपाय आहे. म्हणुनच 31 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. खुलताबाद प्रशासनही धोका पत्करून काम करते आहे. त्यापाश्वभुमिवर पंचायत समिती खुलताबादच्या वतीने ग्रामीण भागात गाडी फिरून लोकांमध्ये कोरोना बद्दलच्या सूचनांचे पालन करण्याबाबत जनजागृती करणार आहे.
या प्रसंगी आज पंचायत समिती खुलताबाद तर्फे कोरोना संसर्ग रोगाच्या जनजागृती साठी गावागावात गाडी फिरून ग्रामीण भागात लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी आज पंचायत समिती सभापती गणेश नाना अधाने यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती दिनेश अंभोरे उपसभापती प्रकाश चव्हाण पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे नगरसेवक अविनाश कुलकर्णी, योगेश बारगळ, परसराम बारगळ, ग्रामसेवक राजेंद्र दांडेकर व पंचायत समितीची अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment