जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यात कोरोनाचा आज गुरुवारी चांगलाच भडका उडाला. एकाचवेळी एकूण 24 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यामुळे जालना जिल्ह्याने शंभरीचा आकडा मागे टाकत तब्बल 110 वर पोहचल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
या 24 जणांमध्ये अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील सहा जनांचा समावेश असून अंबड येथील शारदा नगर मधील 5, बदनापूर तालुक्यातील काटखेडा 5,बदनापूर 1,राज्य राखीव दलातील 1 जवान, आणि कोविड केअर सेंटरमधील 6 जणांचा समावेश आहे.
अंबड येथील शारदा नगर मधील 5 रुग्ण हे नुकतेच घाटकोपर मुंबई येथून परतले असून कोविड केअर सेंटरमधील 6 जण आणि इतर 12 असे 18 रुग्ण हे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.आज एकाच दिवशी रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
Leave a comment