भराड़ी । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील राशन दुकानदार तसेच पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांच्या विरोधात संतोष लहाने यांच्यासह ग्रामस्थांनी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार तसेच उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार दाखल करताच प्रशासन खडबडून जागे झाले. नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी सदरील राशन दुकानासंबंधित चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांच्याकडे पाठविला असता सदरील राशन दुकान निलंबित करण्यात आले आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुंदर गंजीधर गुळवे (पोलिस पाटील) हे महिनाभरात तीन - चार दिवसच स्वस्त धान्य दुकान सकाळी - सकाळी सुरु ठेऊन स्वस्त धान्याची जास्त दराने विक्री करीत असुन दरपञक पावती देत नाही. दरपञक पावती मशीन वेळोवेळी बंद असल्याचेच कारण सांगितले जाते. गव्हू - तांदुळाची वाढीव भावाने विक्री करीत सामान्य नागरिकांची आर्थिक लुटमार करीत आहे . गावातील अनेकांची नावे राशन यादीत समाविष्ट असतांनाही अनेकांजवळ राशन कार्ड नाही. तर अनेकांची नावे ही राशन यादीत नसल्याने अनेक कुटुंबांना राशन पासुन वंचितच राहावे लागत असल्याची तक्रार संतोष लहाने यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार दाखल करताच सदरील राशन दुकान निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस पाटील पद निलंबन निश्चित...?
सराटी येथील राशन दुकानदार सुंदर गंजीधर गुळवे हे स्वतः पोलिस पाटील पदावर कार्यरत असल्याने तसेच सरपंच पदही त्यांच्याच कुटुंबात असल्याने गावातील अनेक गोरगरिब कुटुंबांवर राजकीय दबाव तंञाचा वापर करुन एक प्रकारे अन्यायच करीत आहे . गावातील एका महिलेने तर माझ्या पतीने पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांच्या ञासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार पोलिस अधीक्षक , - उपविभागीय अधिकारी कार्यालय , - पोलिस ठाणे - अजिंठा यांच्याकडे लेखी स्वरुपात केली होती . पिंपळदरी शिवारातील अनेक हेक्टर गायरान जमीनीवरही पोलिस पाटील सुंदर गंजीधर गुळवे यांनी अतिक्रमण केले असल्याच्या तक्रारी असुन संबंधित चौकशींसंदर्भात सखोल चौकशी केल्यास पोलिस पाटील पदही धोक्यात येणार आहे.
Leave a comment