भराड़ी । वार्ताहर
कोरोना विषाणु च्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमी वर मार्च महिन्याच्या 17 तारखे पासुन एकीकडे सर्व सामान्य जनतेला घरी रहा सुरक्षित रहाचे आदेश देण्यात आले तर इकडे रेशन दुकानदार याचे काम दुप्पट वाढलं आहे. पहिले अन्न सुरक्षा पी एच एच,अंत्योदय व शेतकरी योजना मधील कार्ड धारका ला महिन्यातून एकदा धान्य वाटप करून होत होते तर एप्रिल महिन्यात मोफतचे तांदूळ व मे महिन्यात हि या नियमितच्या वाटप बरोबर एन पी एच शिधापत्रीकाधारकाना सवलतीच्या किंमतीत धान्य पुरवठा करण्यात आले.
तुरदाळ व चनादाळ वाटप करण्यात आले आहेत या सर्व परिस्थिती मध्ये मोफत तांदूळ, दाळचे अनुदय कमीशन सह विमा संरक्षण, केरोसीन चे प्रती कार्ड 2ली.चा पुरवठा गॅस कनेक्शन ची अट न लावता सरसकट करण्यात यावा व केरोसीन परवानाधारकांचा रोजगार सुरू करावे.प्राधिकार पत्र त्वरीत नुतनीकरण करून द्यावी.कोरोना चा प्रादुर्भाव जेव्हा पर्यंत दुर होत नाही तेव्हा पर्यंत इपास मशीन वर कार्ड धारका चे अंगठे न घेता नॉमिनी म्हणून दुकानदाराचे अंगठे लावुन वाटप करण्यात यावे इत्यादी मागण्या चे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवने याच्या कडे अध्यक्ष रफिक शेरखान ,उपाध्यक्ष राधेश्याम काका कुलवाल, सचिव पंडित पारधे, मधुकर काका बरडे, पिराजी पाटील, पंडित गोडसे, अजीज पठाण, सलिम बागवान, ठकुबा काकडे, मीनाक्षी जितेंद्र माहोर, भगवान काथार, शे.रब्बानी आदी च्या सह्या सह देण्यात आले.
Leave a comment