औरंगाबाद । वार्ताहर
एकीकडे शहरावर कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपातर्फे पाणीपुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
अशा भागात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. शहरातील नारेगावसारख्या मोठ्या वसाहतींमध्ये गरीब मजूर आणि कामगारांची संख्या जास्त आहे. या वसाहतीमध्ये मनपातर्फे पाणीपुरवठ्याची कोणतीच व्यवस्था केलेली नाही.
या भागात जलकुंभ तसेच जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे पाण्यासाठी बाहेरही जाता येत नसल्याने नागरिकांची पंचायत झाली आहे. या संकटाच्या काळात मनपाने सहानुभूतीपूर्वक विचार करून या नागरिकांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अश्या आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अलियार खान तथा पदाधिकारी यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
Leave a comment