दररोज 500 गरजूंना अन्न वाटपाद्वारे सामाजिक बांधलिकीची जपणूक
औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूला हद्दपार पार करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. तर सराकारी आदेशाचे काटेकार पालन व्हावे यासाठी नागरिक घरांमध्ये सुरक्षित आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचे कौतुकास्पद कार्य शहरातील ह्युमन केअर ऑरगनायझेशन ही सेवाभावी संस्था 1 एप्रिलपासुन करत आहेत. शहरातील उड्डाणपुलाखाली आश्रयास असणारे नागरिक, हातावर पोट असणारे नागरिक असे 500 नागरिकांना दररोज जेवणाचे पॅकेट देण्याच काम करत आहे, तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी स्वच्छतेसाठी आवश्यक त्या वस्तु, आपल्या शहरच्या सिमेवर व शहरातील मध्ये तैनात असलेले पुलिस कर्मचारी तसेच शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असलेले सफाई कामगार यांना सॅनिटाइझर, मास्क, फेस प्रोटेक्टर (षरलश ीहळशश्रवी) देण्याचे कार्यचालू आहे, अन्नधान्य किट देखील वाटप करण्यात येत आहे. आजच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ह्युमन केअर ऑरगनायझेशन ही सेवाभावी संस्था आज गरजवंतांचे पोट भरण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे हे कार्य विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.
देशात आता लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे अनेक नागरिक आहे जे की शहरात ठीक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यातील बर्याच नागरीकांचे खाण्या पिण्याचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासना मार्फत अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तरी देखील काही नागरिकांना जेवण मिळत नसल्याचे समोर आले आहे. अशा नागरिकांना पोलीस कर्मचारी आणि विविध संस्था जेवण देताना दिसत आहेत. या सामाजिक बांधिलकीचाच एक भाग म्हणून शहराच्या हद्दीत ह्युमन केअर ऑरगनायझेशन ही सेवाभावी संस्था कोरोनाच्या संकट समई मोलाचे सहकार्य करण्याचे काम करत आहेत. या सामाजिक कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तुषार जोशी, उपाध्यक्ष. समीर कुलकर्णी, सचिव . दिपक खडके, सुनील पसारकर, उषा अरुण जोशी, तेजल जोशी हे हातभार लावत आहे. इतरांनीही गरजुंना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Leave a comment