सभापती अर्जुन गाढे यांचा इशारा
सिल्लोड । वाार्ताहर
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सीसीआयच्या मार्फत शासकीय दराने कापूस खरेदी सुरू आहे. काही व्यापारी शेतकर्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून इतर शेतकर्यांच्या नावावर नोंद करून तोच कापूस शासकीय दरात विक्री करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. या प्रकारामुळे इतर शेतकर्यांचा कापूस खरेदीसाठी विलंब लागत आहे, शिवाय सदरील प्रकार निंदनीय असून गुन्हेगारी स्वरूपाचा असल्यामुळे शेतकर्यांच्या नावावर कापूस विकणार्या व्यापार्यांवर आता नजर ठेवून कारवाई करणार असल्याचा इशारा देत शेतकर्यांनी ही हा प्रकार रोखण्यासाठी आपला सातबारा कोणत्याही व्यापार्याला देवू नये असे आवाहन सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे यांनी केले आहेत.
दरम्यान शासनाच्या नियमानुसार बाजार समितीच्या वतीने कापूस खरेदी केला जातो . बैलगाडी मध्ये जर कापूस असेल तर त्याला प्राधान्य द्यावे लागते. ऑनलाईन झालेल्या शेतकर्यांचा नियमानुसार कापूस खरेदी केला जात असताना शेतकर्यांऐवजी व्यापार्यांची येथे गोंधळ घालतांना दिसतात. सदरील प्रकार पाहता काही व्यापारी शेतकर्यांच्या नावावर आपला कापूस विकत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे . ज्यांच्यावर संशय आला त्यांची चौकशी करून कारवाई केल्यास हा प्रकार रोखता येईल व खर्या अर्थाने शेतकर्यांना न्याय मिळेल. असे असले तरी अशा प्रकारच्या गैर कामासाठी शेतकर्यांनीही आपला सातबारा कोणत्याही व्यापार्याला देवू नये असे सभापती अर्जुन पाटील गाढे यांनी स्पष्ट केले.
Leave a comment