औरंगाबाद । वार्ताहर
देशातील सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या कार्याला पाठबळ, सलामी देण्यासाठी देशातील दरवर्षी आयोजित होणार्या उत्तराखंड हिमालयन मॅरेथॉन ने यावर्षी व्हर्टूअल मॅरेथॉन 42 किलोमीटर डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना सलामी देण्यासाठी सॅल्यूट द डॉक्टर्स हा इव्हेंट आयोजित केला यामध्ये इन्डोर मॅरेथॉन तसेच नॉन रेड झोन साठी आऊटडोअर मॅरेथॉन आयोजित करण्यात आले या इव्हेंट मध्ये देशभरातून जवळपास 108 पेक्षा ही जास्त स्पर्धकांनी भाग घेतला 24 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत निखिल पवार आणि श्रीनिवास मोतीयेळे यांनी पहाटे देवळाई येथील नॉन रेड झोन भाग असलेला साई टेकडी ते कचनेर येथील डोंगरी रस्ता योग्य सोशल डिस्टंसिन्ग चे भान राखून सहा ते सात तासात 42 किलोमीटर हे खडतर अंतर पूर्ण केले. या इव्हेंट साठी देखील या दोघांनी वेळेची अचूक नोंद घेण्यासाठी स्त्रवा या एप ची मदत घेतली.
या इव्हेंट च्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार यांच्या कार्याला मनापासून सलामी देणे व आरोग्याची मॅरेथॉन च्या माध्यमातून काळजी घेणे हे उद्देश या दोघांचे होते. हा खडतर इव्हेंट पूर्ण केल्या बद्दल व्हिट्स हॉटेल्स चे व्यवस्थापक शिबाप्रसाद पसूपालक, अग्रसेन विद्या मंदिर चे सचिव ऍड मुकेशजी गोयंका, प्राचार्य सुभाष धवन, पंकज भारसाखळे, अभय देशमुख, डॉ सुनील देशमुख, डॉ प्रफुल जटाळे, डॉ उदय डोंगरे, डॉ संदीप जगताप,चरणजीत सिंग, रुस्तम तुपे, अशोक काळे, मुकेश बाशा, राजेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment