जालना । वार्ताहर
कोविड - 19 अर्थात कोरोना या महामारीचे दुष्टचक्र भेदून अवघ्या अकरा दिवसात तंदुरुस्त होत घरी परतलेल्या कोरोना दिग्विजयार्थीचे बुधवारी ( ता. 27) नवीन जालना भागातील कॉलेज रोड स्थित आनंद नगर सोसायटी वासीयांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तथापि कोरोना या महाभयंकर आजाराबाबत माहिती पेक्षा दहशत अधिक पसरली असून घाबरून जाण्याचे कसलेही कारण नाही. नियमित औषधे व काळजी घेतल्यास कोरोना वर अगदी सहजरीत्या मात करता येते. असे अभिषेक लाठी यांनी सांगितले. बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे जालना शहरातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले असून अशा प्रकारे नवीन जालना भागातील एका हॉस्पिटलशी संबंधित असलेले व्यापारी अभिषेक लाठी यांना दि. 16 मे रोजी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचे नमुने घेतल्यानंतर दिनांक 17 मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हा सुरुवातीला दहशत निर्माण झाली होती. प्रतिबंधक उपाय म्हणून प्रशासनाने ते राहत असलेल्या आनंद नगर सोसायटी चा परिसर पूर्णतः तील केला होता. येथील सुज्ञ नागरिकांनी ही घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य केले. त्यामुळे येथील परिसर पुर्णपणे सुरक्षित राहिला. अभिषेक लाठी यांनी सांगितले की, आपल्या गळ्यात खरखर होत असल्याने अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिल्या दिवशी थोडी भिती वाटली. पण डॉक्टरांनी दिलेल्या औषधी, कोमट पाणी, अद्रक व लसूण यांचा काढा दिवसातून दोन वेळा नियमीत सेवन केल्याने भुक ही लागत होती.असे सांगून अभिषेक लाठी म्हणाले, 2 वेळ जेवण करून तेथील वातावरण पाहिल्यावर सहजपणे कोरोना वर मात करू शकतो. असा आत्मविश्वास निर्माण झाला. रविवारी ता. 24 रोजी दुसर्यांदा नमुने घेतले तेव्हा अहवाल निगेटिव्ह येईल आणि सुखरूप घरी पोहोचू असा दुर्दम्य आशावाद निर्माण झाला. आणि शेवटी तसेच घडले. असे अभिषेक लाठी यांनी नमूद केले. दरम्यान बुधवारी दुपारी त्यांनी सोसायटीत प्रवेश करताच येथील रहिवाशांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत टाळ्या व थाळ्या वाजवून अभिषेक लाठी यांचे स्वागत केले. या वेळी नाट्यांकुर चे प्रकल्प प्रमुख जयेश पहाडे, अरुण लाहोटी,डॉ. भारत आगाशे, विजय बियाणी, रवि पित्ती, सीमा पहाडे, सतीश कामड, संजय प्रितानी, रमेश मानधनी, किशोर कामड,हर्ष मानधनी, लतेश पहाडे, जगदीश कामड, अॅड. नंदकुमार कारिया यांच्या सह महिला, नागरिक , युवक- युवतींची उपस्थिती होती. दरम्यान आपुलकी च्या स्वागताने भारावून गेलो. अशी प्रतिक्रिया लाठी यांनी व्यक्त केली.
Leave a comment