परतुर । वार्ताहर

शहरातील बहुतेक दुकाने दि 22 पासून  उघडली असली तरी रस्त्यावर दिसणारी वर्दळ ग्राहकांची नसल्याने व्यापारी वर्ग चांगलाच चिंतेत आहे. शासनाने टप्प्या टप्प्याने ढील देत व्यवहार सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे. 5 दिवस झाले असतांनाही परतुर शहरात मात्र पाहिजे तसा ग्राहक मिळत नसल्याने व्यापारी वर्ग आश्‍चर्य चकित आहे. रस्त्यावर दुपारी 12 पर्यंत व सायंकाळी वर्दळ दिसत असली तरी यात रिकामटेकड्यांचा भरणा जास्त असंतो त्यामुळे दुकानावर ग्राहकीअत्यंततुरळक दिसते.किराणा,भाजीपाला,मेडिकल ,दवाखाने सोडले तर इतर व्यवसाय अद्यापही ठप्प असल्यासारखे आहेत.

शहरात देशी विदेशी दारू आता पार्सल मिळत असल्याने त्यांची व त्या सोबत मटणाची ग्राहकी जोरात सुरू आहे. पण मद्यपीना पिण्याची अडचण व कमालीचे वाढलेले तापमान लक्षात घेऊन अनेक मद्यपीनी  पिण्यासाठी रात्री शहरातील मोकळ्या जागेचा  विशेषतः नव्याने झालेल्या प्लाटिंग च्या जागेचा  हवेशीर वापर सुरू केलेला आहे.  परतुर पोलीस स्टेशन चे विशेष पोलीस अधिकारी तांबे यांचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने त्यांना येथून जावे लागले .अत्यंत कडक शिस्तीचे तांबे यांनी सर्वच अवैध धंदे बंद करून आपला ठसा उमटवला होता.ते 16 मे ला गेल्यानंतर आपल्याला मोकळे रान आहे असे समजणार्‍या अवैध धंदे चालकांचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला.कारण विद्यमान पोलीस अधिकार्‍यांनी तांबे गेल्यानंतरही कोणतीच ढील न दिल्याने सारे आश्‍चर्यचकित आहेत.   जसा ग्राहकीचा ङ्गटका व्यापारी वर्गाला बसतो आहे तसाच तो एसटीला ही बसत आहे, जिल्ह्यातील बस सेवा काही अटीवर सुरू असली तरी प्रवासी मिळत नसल्याने परतुर बस आगाराची चिंता वाढली आहे. आता तोट्यात चालणारी ही सेवा किती दिवस सुरू राहील असा प्रश्‍न आहे.  शहरात एकही कोरोना रुग्ण नाही. आतापर्यंत तालुक्यात केवळ दोनच कोरोना रुग्ण होते,तालुक्यातील शेरोडा येथील 38 वर्षाची महिला  व वरङ्गळ येथील 25 वर्षाचा तरुण ते दोघेही कोरोना मुक्त झाले.परतुर शहरात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नसल्याने व तालुका सध्या कोरोना मुक्त असल्याने प्रशासन कडक सक्तीच्या उपाययोजना राबवत नसल्याचे चित्र आहे, अंबड,मंठा व घनसावंगी तालुक्यात कोरोना धुमाकूळ घालत असताना परतूर कर मात्र आतापर्यंत तरी सुदैवी ठरले आहेत. मात्र कोरोना मुक्त शहर असतानाही दुकाने उघडून बसलेल्या व्यवसायिकांना ग्राहकांची वाट पहाण्याची वेळ का येत आहे हा मोठा प्रश्‍न आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.