कुंभार पिंपळगाव । वार्ताहर

कोरोनाच्या काळातील मोदी सरकारच्या शेतकरी व मजुर विरोधी धोरणाचा किसान सभेच्या वतीने गावागावांमध्ये निषेध व प्रतिकार दिन  300 च्या वर शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बनवलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने केलेल्या आवाहन नुसार दि 27 रोजी किसान सभा (लाल बावटा) माध्यमातून घनसावंगी तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी मागण्यांचे ङ्गलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला आणि प्रतिकार  दिन पाळण्यात आला.

राजा टाकळी या आपल्या गावी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष गोविंद आर्द्ड यांनीही आपल्या घरावर झेंडा ङ्गडकून मागण्यांचे पॉटर हातात घेऊन निषेध केला अचानकपणे लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे त्याचा ङ्गटका शेतकरी कष्टकार्याना जास्त भोगावा लागला शेतकर्‍याच्या घरात असलेला शेतमाल मार्केट  बंद असल्याने विकता आला नाही ङ्गळे भाजीपाला खराब झाला कापसाचे भाव पडले सरकारी हमी भाव केंद्रे कमी असल्याने व कापुस  खरेदी यंत्रणा संथगतीने असल्याने खाजगी व्यापा-यांन कडून  शेतकर्यांची लूट झाली.परिणामी शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले अतिवृष्टी आणि लॉक डाऊन आशा दोन्ही संकटाने शेतकरी पूर्ण उद्धवस्त झाला असताना सरकारने आता जाहीर केलेल्या पॅकेजमधून कोणताही दिलासा त्याला मिळालेला नाही हे पॅकेज ङ्गक्त गर्भश्रीमतच्या बाजूचे आहे.तसेच राज्य सरकारने सुद्धा कुठलेही मदतीचे पावले उचललेली नाहीत.हे दोन्ही सरकार कोरोनाची परिस्तिथी हाताळण्यात अपयशी ठरले आहेत म्हणून आज या दोन्ही सरकारचा गावोगावी  निषेध करण्यात आला आहे  शेतक-यांना अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान  आणि लॉक डाऊन मुळे विकता न आल्याने शेतीमालांच्या झालेल्या पीक नसून भरपाई सरकारने द्यावी,मूठभर गर्भ श्रीमंतांना ज्या प्रेमाचे 68 हजार कोटी रुपये कर्जमाङ्गी दिली तेव्हा शेतकरी शेतमजुरांचीही सरसकट कर्जमाङ्गी करावीत्यासाठी विदेशातील काळा पैसा आणावा,खरीप हंगामासाठी मोङ्गत बी बियाणे व खते देण्यात यावीत,थकीत असो व नसो सर्व शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यात यावे,सरकारी कापूस खरेदीकेंद्राची संख्या वाढू  खरेदीची गती वाढवावी, सर्व शेतमालाला उतपादन खर्च अधिक पन्नास टक्के नङ्गा असा हमी भाव द्यावा या व इतर अनेक मागण्यांचे पोस्टर्स हातात घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा निषेध व प्रतिकार दिन पाळण्यात आला घनसावंगी तालुक्यात राजा टाकळी अंतरवली टेम्भी मुद्रेगाव मूर्ती,काकडे कंडारी, उक्कडगाव,लिंबोनी,राजूरकोठा, कोठी यासह अनेक गावांत हा निषेध करण्यात आला.या निषेध या निषेध निदर्शनाचे नियोजन किसान सभेचे गोविंद आर्द्ड,बाळू आर्द्ड,सोनू भोरे,दगडू आर्द्ड,भरत तौर परमेश्‍वर मोरे,कल्याण भोसले,कुलदीप आर्द्ड आदिंची केले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.