तिर्थपुरी । वार्ताहर
तीर्थपुरी. घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील पंधरा दिवसापुर्वी 25 वर्षीय युवकाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असून खापरदेव हिवरा येथे गावकरी भयभीत झाले आाहेत. पंधरा दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील रायपुर येथून खाजगी जॉबला होता. व तो गावाकडे मोटार सायकलवर परत आला होता. मात्र ग्रामसेवक यांच्याकडून त्याला क्वारंटाईन करने गरजेचे असताना देखील त्याला क्वारंटाईन केले नाही व तो खुलेआम फिरत होता.मुलासोबत पोहायला देखील जात होता मात्र काल अचानक त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घरच्यांनी डॉक्टरला बोलावून स्वतः घनसावंगी येथे दवाखान्यात पाठवले असता त्याचा रिपोर्ट आज दि. 27 रोजी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे खापरदेव हिवरा तेथील नातेवाईक व मित्र कंपनी यांना देखील आता क्वारंटाईन करण्याची वेळ आलेली आहे.
हा सर्व हलगर्जीपणा ग्रामसेवक यांच्यामुळे झाला असल्याचे येथील गावकरी यांनी सांगितले आहे. तीर्थपुरी पासून चार किलोमीटर अंतरावर असणारे खापरदेव हिवरा गाव असल्याने तीर्थपुरी येथे देखील धोका निर्माण झाला आहे. तसेच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सोनवणे हे मुख्यालय ठिकाणी राहत नसून अंबड येथून अपडाऊन करीत असल्यामुळे लाख डाऊन व संचार बंदीच्या काळात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना सोनवणे हे गावात तीन तीन चार चार दिवस फिरकत सुद्धा नव्हते यामुळे गावात येणार्या लोकांची नोंद ग्रामसेवक नसल्यामुळे केली जात नाही तरी आज पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे शासनाचे आरोग्य पथक तलाठी यांनी गावात येऊन पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात असलेल्या ची लोकांची यादी केली असून गावात पथक तळ ठोकून आहे.
Leave a comment