आष्टी । वार्ताहर
इंडियन जर्नालिस्ट असोशियन च्या परतुर तालुका सचिवपदी गवळी समाज सेवा संघाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष व तसेच मराठवाडा साथीचे पत्रकार जनार्धन जाधव यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष अस्लम कुरेशी यांनी केली आहे.
इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतिष महामुनी यांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष अस्लम कुरेशी यांनी ही नियुक्ती केली. जनार्धन जाधव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट ओशियन मध्ये ग्रामीण व लेकर शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोडून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे तसेच पत्रकारावर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सदैव तत्पर राहावे जनार्धन जाधव यांच्या नियुक्तीबद्दल मोहन सोळंके (सकाळ) आनंद आढे( बंजारा लाईव्ह रिपोर्ट) गणेश आगलावे (देशोन्ती( राहुल आवटे (सी. एन. आय. महाराष्ट्र) माऊली सोळंके (लोकनायक) सतिश पवार (लोकप्रश्न) उद्धव डोळस ( आनंद नगरी ) अंगद मुंडे( आत्ताच एक्सप्रेस) गोपाल पोटे (राज्यकर्ता) नजीर कुरेशी (लोकमत) तरंग कांबळे (हॅलो रिपोर्टर) सय्यद वाजिद (राज्यवार्ता) मुनीर खान पठाण (पोलीस नवरंग) सय्यद अकबर (दिव्य मराठी) पांडुरंग शेजुळ गाव माझा रिपोर्ट इमरान कुरेशी मराठवाडा केसरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a comment