परतूर तालुका आष्टीतील सर्वच बँकेत उडाला सोशल डिस्टन्सचा फज्जा
सामाजिक अंतर राखण्याकडे लोकांचे दुर्लक्ष !
प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे रखरखत्या उन्हात खातेधारकांची बँकेच्या दारावर झुंबड
कोरोना रक्षक झाले गायब
आष्टी । सतिष पवार
देशभरात कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळी वेळी सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या अत्ता पर्यंत तीनदा या कोरोना ला रोखण्यासाठी लॉक डाउन करण्यात आले या शुक्रवार पासुन व्यवसायिकांना काही प्रमाणात दिलास देत अत्यावश्यक सेवा सोडून इतर हि प्रस्थाने सुरु करण्याची मुभा प्रसाशानाच्या वतीने थोडीशी शिथिलता देत सामाजिक सुरक्षितता राखण्याच्या अटीचे पालन करण्याच्या सूचना देत व्यवसायिकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान सूट देण्यात आली मात्र ही सूट सध्या अधिक धोकादायक होताना दिसून येत आहे सर्वत्र गर्दीचा लोंढा पहावयास मिळत आहे व्यावसायिकांनी सामाजिक अंतर राखण्यासाठी सांगूनही नागरिक या बाबी कडे काना डोळा करीत आहेत लोकांना कोरोनाचे कोणतेही गांभीर्य दिसून येत नसल्याने व सध्या पोलिस यंत्रणा देखील म्हणावी तसे लक्ष देत नसल्यामुळे आष्टी ता परतूर येथे सर्वत्र दुपारी दोन वाजेपर्यंत गर्दीच गर्दी पहावयास मिळत आहे शिवाय बँकेच्या दारात रखरखत्या उन्हात खातेधारकांची देखील झुंबड उडाली असल्याने सोशल डिस्टनचा पुरता फज्जा उडाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक आष्टी
आष्टी येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आशा एकूण तीन शाखा आहेत. या शाखेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून नागरिकांनी इतक्या दिवस स्वयंशिस्त पळत सामाजिक अंतर ठेवले होते मात्र शुक्रवार पासुन हि शिस्त दिसेनाशी झाली आहे पोलिस यंत्रणा पण या काही दिवसा पासुन ढिल्ली पडल्यामुळे नागरिक सोशल डिस्टनचे पालन करण्याचा विसर पडला आहे.एकीकडे कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात आढळुन येत असताना कोरोनाच्या गुनाकाराने गती घेतली आहे दुसरीकडे मात्र याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्यागत वागत असलेले लोक व कुचकामी ठरत असलेली प्रशासकीय यंत्रणा यामुळे विषाणूसांसर्गाचा धोका अधीक वाढण्याची भीती निर्माण केली जात आहे.
एसबीआय बँक आष्टी
त्याचाच प्रत्यय आष्टीत दिसून येत आहे येथील सर्वच बँकेच्या शाखेत खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला धुडकावून लावत मोठी गर्दी होत आहे बँकेच्या व्यवस्थापकानी नागरिकांना सुचना देवूनही नागरिक लक्ष न दिल्याने व पोलिस यंत्रणेच्या गैरहजेरी मुळे लोकांनी बँकेत गर्दी केली. सध्या उन्हाचा पारा अधिक वाढला असुन अंगाची लाही लाही होत आहे सामजिक अंतर राखण्यासाठी बँकेने खातेदारांसाठी निवारा करणे आवश्यक असतांना देखील अनेक वेळा मागणी करून सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र व जिल्हा मध्यवर्ती बँकेने अद्यापही खातेदार यांना रांगेत उभे राहन्यासाठी सावली करणे गरजेचे होते मात्र बँकांना या बद्दल काही देणेघेणे नसल्यागत वागत असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढला असुन बाहेर गावाहून आलेले नागरिक देखील होम कोरोटाईन राहत नसून बाहेर फिरत असल्याचे अनेक वेळा दिसून येत आहे आष्टीत गेल्या काही काळात कोरोना रक्षक रस्त्यावर येऊन गर्दी होणार नाही या साठी झटणारे कोरोना रक्षक देखील सध्या गायब असल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायत देखील ध्वनिपेक्षक वापरून सावधान करीत होती ती पण गायब गर्दीचा आढावा घेणारे ग्रामसेवक पण गायब अशी स्थिती सध्या आष्टीत दिसून येत आहे हीच स्थिती कायम राहिल्यास कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .
Leave a comment