माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात
जालना | प्रतिनिधी
जगभरात करून प्रादुर्भावाने थैमान घातलेले असताना महाराष्ट्र मध्ये देखील 55 हजार पेक्षा अधिक करुणा ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत देशातील एकूण करुणा ग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात 50% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत असे चित्र निर्माण झाले आहे याबाबत महाराष्ट्र शासनाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसून कोणत्याही प्रकारची उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही सर्व बाबतीत महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून राज्यकर्ते स्वतःची जबाबदारी झटकून एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघात माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केला
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात यावा यासाठी उपायोजना करण्याची आवश्यकता असताना महाराष्ट्र सरकारने किती निधी खर्च केला असा सवाल देखील यावेळी बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 104 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र सरकारला दिला असून वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून महाराष्ट्र राज्याला 78 हजार 500 कोटी रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर कर्ज स्वरूपात महाराष्ट्राला 1 लाख 65 हजार कोटी रुपये केंद्र सरकार च्या संमतीने मिळू शकतात अशी एकूण दोन लाख 71 हजार 604 कोटी रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली व होणार आहे परंतु राज्य सरकार मात्र केंद्र शासनाला दोष देण्यात धन्यता मानत आहे ही बाब योग्य नसून जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगावी अशा प्रकारची टीका आमदार लोणीकर यांनी यावेळी केली
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडून राज्य सरकारला काय व किती प्रमाणात देण्यात आले या संदर्भातील विश्लेषण केले आहे तरी देखील राज्य सरकार मात्र विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारला दोष देण्यात आणि अपयश एकमेकांवर ढकलण्यात धन्यता मानत आहे असेदेखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले
प्रत्यक्षात प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या माध्यमातून तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. त्यात
1750 कोटी रूपये (गहू), 2620 कोटी रूपये (तांदूळ), 100 कोटी रूपये (डाळ) तर
स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रूपये
असे एकूण 4592 कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1726 कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून 1958 कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रूपये असे एकूण 3800 कोटी रूपये केंद्र सरकारने दिले. उज्वला गॅस योजनेत 73 लाख 16 हजार सिलेंडर एकूण 600 रेल्वेगाड्यांसाठी 300 कोटी रूपये, बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण 1001 कोटी रूपये, एसडीआरएफमध्ये 1611 कोटी रूपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रूपये असे एकूण 2059 कोटी रूपये केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला दिले आहेत त्याचप्रमाणे डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5648 कोटी रूपये देण्यात आले. अशी माहिती यावेळी बबनराव लोणीकर यांनी दिली
केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला शेतमाल खरेदीसाठी देखील निधी देण्यात आला आहे त्यात कापूस खरेदीसाठी 5647 कोटी रूपये, धान खरेदीसाठी 2311 कोटी रूपये, तूर खरेदीसाठी 593 कोटी रूपये, चणा/मका खरेदीसाठी 125 कोटी रूपये तसेच पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये असे एकूण 9079 कोटी रूपये केंद्र सरकार मार्फत देण्यात आले, हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात 28,104 कोटी रूपये दिलेले आहेत. अशी माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली
महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदत
महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विनसाठी 47 लाख 20 हजार, 41 अशासकीय प्रयोगशाळा तर 31 खाजगी प्रयोग शाळांना मान्यता देण्यात आली, 9.88 लाख पीपीई किट्स केंद्र शासनामार्फत राज्य शासनाला पुरवण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर 15.59 लाख एन 95 मास्क केंद्र सरकारने दिले आहेत आरोग्यासाठी मदत म्हणून 468 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे अशी माहिती देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी दिली
केंद्र सरकारच्या पॅकेजमधून एमएसएमई, गृहनिर्माण, डिस्कॉम, नरेगा, आरआयडीएफ, कॅम्पा एम्पॉयमेंट, स्ट्रीट वेंडर्स, फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान 78,500 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील. जे मिळाले ते 28 हजार 104 कोटी रूपये याच बरोबर केंद्र सरकार मुळे महाराष्ट्राला 1 लाख 65 हजार कोटी रुपयांचा निधी उभारता येऊ शकतो, असे एकूण 2,71,604 कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. परंतु राज्य सरकार मात्र विनाकारण विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारच्या नावाने टाहो फोडत आहे असा आरोप देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी केला
राज्यकर्त्यांची राजकीय प्रगल्भता दाखवण्याची व धाडसी निर्णय घेण्याची गरज असून महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट स्वरूप धारण करत आहे रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ होत असून दिवसेंदिवस विदारक चित्र निर्माण होत आहे अशा परिस्थितीत चाचण्या वाढवण्याची गरज असताना आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिघांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असून या तिघांमध्ये समन्वय दिसून येत नाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खुद्द राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून महा विकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे कोरोना पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत निंदनीय असून समन्वय नसल्याने आपसातील आत्मक्लेष विरोधी पक्ष व केंद्र सरकारवर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न हे तिन्ही पक्ष करत असल्याचा घणाघात देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी केला.
Leave a comment