औंरगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 25 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1330 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना मोंढा (1), बायजीपुरा (2), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4), जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), रहिम नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 12 महिला आणि 13 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 811 जण कोरोनामुक्त
औरंगाबाद शहरातील मनपाच्या कोविड केअर केंद्र असलेल्या एमआयटी मुलांचे वस्तीगृह येथून चार, किल्लेअर्क येथून 14, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) दोन, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) सात, खासगी रुग्णालयातून तीन असे एकूण 30 कोरोनाबाधित रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातून 811 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असे मनपा प्रशासनाने कळवले आहे.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत औरंगाबाद शहरातील इंदिरा नगरातील 55 वर्षीय महिला, जय भीम नगरातील 72 वर्षीय पुरूष, जाधववाडीतील 57 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात आतापर्यंत चार, घाटीत 53 आणि मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 58 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
Leave a comment