अण्णांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न-भाऊसाहेब घुगे
जालना । वार्ताहर
गरीब- श्रीमंत आणि आप- पर असा भेद अण्णांनी कधीच केला नाही. सातत्याने सेवाभाव ठेऊन कार्य करणार्या अण्णांना ङ्गाटका माणूस मोठा झालेला पाहण्याची मोठी हौस होती. त्यांचे तेच स्वप्न आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे उद्गार कै. एकनाथराव घुगे यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी येथे बोलतांना काढले.कै. एकनाथराव घुगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भराडखेडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपन, गरवंतांना किराणा कीटचे वाटप, मास्क- सॅनिटा यझरचे वितरण आदी कार्यक्रमा प्रसंगी श्री. भाऊसाहेब घुगे बोलत होते. बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील पंचवीस वर्षे सरपंच राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कै. एकनाथराव घुगे यांची काल 14 वी पुण्यतिथीनिमित्त अण्णांच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी सोशल डिस्टन्सचे अंतर राखून कुटुंबाच्यावतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कीर्तनाचा कार्यक्रम व जेवणाचा कार्यक्रम न ठेवता सामाजिक कार्याने अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.मागील महिन्यात भाऊसाहेब घुगे यांच्यावतीने अण्णांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बदनापूर तालुक्यातील 79 गावांमध्ये सोडियम हायड्रोक्लोराइड ङ्गवारणीचे औषध वाटप करण्यात आले. बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाचशे कुटुंबांना किराणा सामान वाटप करण्यात आले. आज गावातील गरजू, गोर गरीब, निराधार, अपंग, ज्यांचे हातावर पोट आहे अशां नागरिकांना अण्णांच्या स्मृतीप्रित्यर्थ किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सॅनीटायझर, माक्स व गावांमध्ये यावर्षी 500 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्याचा शुभारंभही काल मान्यवर व गावकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख तथा अण्णांचे चिरंजीव भाऊसाहेब घुगे, बंधू शाखा अभियंता अशोक घुगे (सा. बां. विभाग )व कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे (जलसंपदा विभाग उस्मानाबाद), अण्णांचे बंधू भानुदास घुगे, पुतणे बाबा घुगे, नगरसेवक गणेश घुगे, नारायण घुगे, राधाकिसन घुगे, हरिदास घुगे,सुभाषराव बारगजे केशवराव दराडे, बाबासाहेब दराडे, रामेश्वर दराडे, सखाराम जावळे, गोपीनाथ मुळक, ज्ञानेश्वर मुळक, कैलास पालवे, दीपक पालवे ,बाबुराव दराडे, वाल्मीक दराडे, अर्जुन तुपे, विलास तुपे, स्वप्नील बारगजे, अनिरुद्ध घुगे ,योगेश घुगे ,विकास घुगे, राहुल निगवेकर, दीपक डीघे, संतोष ताटे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a comment