बाजार समितीचे भविष्य टांगणीला
परतुर । वार्ताहर
तालुक्यातील आष्टी मार्केट कमिटी अंतर्गत शासकीय कापूस खरेदी न झाल्याने आष्टी मार्केट कमेटीला सुमारे 35 लाखाचा ङ्गटका बसला आहे. ‘आधीच मर्कट अनं त्यात दारु प्याला‘ अशी काहीशी अवस्था बाजार समितीची झालेली आहे परतुर मार्केट कमिटीचे विभाजन करून काही वर्षाखाली आष्टी बाजार समितीची निर्मिती झाली होती. जवळपास 35 गावे या बाजार समितीच्या कार्यकक्षेत येतात. तालुक्यातील सुपीक असा गोदावरी नदीकाठ बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने आष्टी बाजार समिती भरभराटीला येईल असा कयास त्यावेळी मांडला जात होता, पण हा अंदाज सपशेल खोटा ठरला. ही बाजार समिती शेतकरी वर्गाला आधार न ठरता केवळ राजकिय पदाधिकारी यांना मानसन्मान मिळविण्यातचं मोठी ठरली.
आष्टी मार्केट मध्ये भुसार मालाची आवक अतिशय कमी होत असते, त्यामुळे आडत व्यापारी ही अडचणीचा सामना करत असतात तर भुसार मालाच्या आवक मधून मार्केट कमेटीला थोडेङ्गार उत्पन्न मिळते त्यातून कर्मचारी खर्च निघत नाही,अशा वेळी महामंडळ कापूस खरेदीतुन मार्केट ला उत्पन्नाची हमी होती पण दुर्दैवाने राज्य पणन महासंघ किंवा केंद्रीय कापूस महामंडळ यांनी अद्यावत जिनिंग ची परिसरात उपलब्धता नसल्याचे कारण देत आष्टीत अनेक वर्षात खरेदीकेंद्र सुरूच केले नाही , परिणामी मार्केट ला प्रमुख उत्पन्न सोर्स राहिलाच नाही.प्रतिवर्षी यामुळे मार्केटला 30 ते 35 लाखाचा ङ्गटका बसतो आहे. गेले 5 वर्षे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री राहिलेले बबनराव लोणीकर यांच्या ताब्यात आष्टी मार्केट कमिटी आहे, हा परिसर त्यांचा बालेकिल्ला समजला जातो त्यांच्या 5 वर्षाच्या मंत्री कार्यकाळात मार्केटला चांगले दिवस येतील असे वाटतं होते मात्र तसे काही झाले नसल्याने या भागातील शेतकर्यांच्या अपेक्षावर पाणी ङ्गिरले.आता ते विरोधी पक्षात असल्याने ती अपेक्षा ही राहिली नाही आष्टी मार्केट अंतर्गत येणार्या शेती पट्ट्यात कापसाचे उत्पादन मोठे होते,आज या भागातील शेतकरी कापूस विक्रीसाठी भटकंती करत आहेत. शासकीय खरेदी नसल्याने व्यापारी कमीभावाने खरेदी करून लूट करत आहेत अशावेळी आष्टीत अद्यावत 1 किंवा 2 जिनिंग सुरू झाल्या तर त्यांच्या पुढील प्रश्न मिटणार आहे पण त्यासाठी आमदार लोणीकर यांनाच मोठी भूमिका घ्यावी लागणार आहे. तरचं आष्टी मार्केट ला भविष्य असणार आहे नसता या मार्केट कमेटीचे अस्तित्वचं राहील का असा प्रश्न आहे.
Leave a comment