औरंगाबाद । वार्ताहर
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने आयोजित आज ‘धान्य बाजार’ चे उद्घाटन माजी महापौर त्रिंबक तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यात शेतकर्यांच्यावतीने भाजीपाला, फळ, धान्य हे एकाच छताखाली थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा बाजार लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत दररोज सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दि. 26 ते 31 मे दरम्यान श्रीहरी पॅव्हेलियन, गारखेडा परीसर येथे सुरू असणार आहे. या धान्य बाजारचा मुख्य उद्देश शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शहरातील ग्राहकांना रास्त भावात भाजीपाला,्फळे आणि धान्य मिळावा हा हेतू आहे. यावेळी महापौर नंदकुमार घोडेल, नितीन घोगरे, राजु वैद्य यांची उपस्थिती होती. सर्व ग्राहकांनी शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येथून फळे, भाजीपाला, धान्य विकत घ्यावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.
Leave a comment