शेतकर्याचे लाखो रुपयाचे नुकसान
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरातील पारधच्या जनार्दन उमाजी पाखरे यांच्या शेतातील पत्राच्या गोठ्याला आग लागून एका गायीच्या वासरासह लाखाचे साहीत्य जळून खाक झाले.
पारध येथील अल्पभुधारक शेतकरी जनार्दन पाखरे यांच्या गट नं 78 मध्ये वीस पत्राचे गायी म्हशी व शेती उपयोगी साहीत्य ठेवण्यासाठी शेड तयार केले होते. मात्र रात्री उशीरा अचानक आग लागली .शेजारीच असलेले शिवसैनिक संदिप क्षिरसागर व त्याच्या मित्रांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तो पर्यत एक गायीचे वासरु मरण पावले तर एक भाजले गेले .औषधी फवारणीचे दोन पम्प.तुषार सिंचन.ठिंबक सिंचन.खतांच्या गोण्या.पेरणीसाठी ठेवलेली बियाणे शेती उपयोगी साहीत्य.व वीस पत्राचे शेड जळून खाक झाले .असे मिळून लाखोचे नुकसान झाले .या घटनेची माहीती मिळताच पारध सजाचे प्रभारी तलाठी काळे यांनी पंचनामा केला यावेळी शेषराव देशमुख .संतोष पाखरे.रमेश पाखरे.तुळशीराम लोखंडे.रामदास लोखंडे.आदी उपस्थित होते.
Leave a comment