मंठा । वार्ताहर
तालुक्यात कानडी गावात मुंबई हुन आलेल्या एका गरोदर माता जिला प्रा.आ.के तळणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ सुरवसे यांनी तिच्या लक्षणानुसार व प्रवासाचे इतिहासा वरुन दि. 22 रोजी मंठा येथील मॉडेल स्कुल येथे पुढील तपासणी पाठविण्यात आले होते त्या महीलेचा नमुना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले तो आज पॉझिटिव्ह प्राप्त झाली आहे त्या मा.तहसीलदार सुमन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 26 रोजी कानडी गावात 4 आरोग्य पथकाचे सहायाने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे ..तर हानवतखेडा येथील महीलेचा ही कोरोना चा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
सदरील महिला मुंबई हुन दि. 19 रोजी हानवतखेडा येथे आली असता तिला शेतात अलगीकरण करण्यात आले होते व दि.22 रोजी पहाटे सदरील महीला लंघुशंके करीता उठली असता अंधारात पाय घसरुन पडले ने तिला अंबड चौफुली जालना येथील खाजगी हॉस्पिटल येथे उपचार करण्यासाठी दाखल केले व पुढील उपचारासाठी जि.सा.जालना येथे दाखल केले असा त्यानी त्या महीलेचा नमुना घेतला व आज पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून हानवतखेडा गावात 3 आरोग्य पथकाचे सहाय्याने उद्या दि 26 पासून आरोग्य सर्वेक्षण करण्यात येईल तर मौजे पागरा गडदे येथे दिल्ली हुन आलेल्या दोघांना ही काल मॉडेल स्कूल मंठा येथे पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले .अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिपक लोणे यांनी दिली आहे.
Leave a comment