कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील गावात जवळील लिंबोणी रस्त्यावरील चांडक यांच्या शेतातील रोहीत्र एक ते दोन महिन्यापूर्वी जळाल्याने अनेक शेतकर्यांची उन्हाळी बाजरी,ऊस,केळी, गुरांचा चारा मका, कडूळ, पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे येथील संबंधित अभियंत्यांना कल्पना देऊनही सुद्धा दुर्लक्ष केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. प्रत्येक वेळेस शेतकरी वाहतूक खर्च दोन्ही ठिकाणची हमाली हजारो रुपये खर्च करून शेतात डी .पी बसवली जाते गेल्या दीड-दोन महिन्यांपासून येथील डी पी जळलेली असून ती आहे त्या जाग्यावरच पडून आहे सध्या उन्हाळा असून थोडेङ्गार पाणी असून सुद्धा डी पी जळाल्यामुळे पाणी देता येत नाही. येथील ज्ञानदेव आरगडे,खाजाभाई कुरेशी यांचा ऊस लाईट नसल्यामुळे पाण्या अभावी ऊस करपून गेला आहे . हजारो रुपयांचे शेतकर्यांचे पीक जळाल्यामुळे नुकसान होत आहे याकडे संबंधित अधिकार्यांनी त्वरित लक्ष घालून जळालेली डी पी दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकर्यांमधून केली जात आहे.
Leave a comment