पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉक डाऊन चालु आहे् त्यातच तापमानात वाढ होवुन ते 41 सेल्सिअंस पर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे परिसरातिल नागरिक घामाघूम होत आहे. आणि त्यातच पिंपळगाव रेणुकाई येथे पाणि टंचाईच्या झळा बसत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात होता.पिंपळगाव वासियांना मुबलक पाणि पुरवठा करता यावा यासाठी ग्राम पंचायत प्रशासनाच्या ताब्यात तिन विहिरी तयार आहे.शेलूद येथील धामना धरण. दानापुरचे जुई धरण अशा या दोन धरणातुन कितेक कोटी खर्च करून देखील पिंपळगावकरांसाठी पाच योजना उषाला तरिपण कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
पण पिंपळगाव चे सक्रिय व कर्तव्यदक्ष सरपंच अर्चना ताई देशमुख यांना मात्र पाणि टंचाई शांत बसु देईना त्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न चालु होते्. आणि त्यांच्या सोबत ग्रामविकास अधिकारी ए. आर्.काकडे.व दूरदृष्टी ठेवून नेहमीच गाव विकासाच्या बाबतीत कोणताही विषय असो त्यासाठी हिरीरीने भाग घेवुन ते काम पूर्णत्वास नेणारे भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांचे पण पिंपळगाव येथील नागरिकांप्रती ग्राम पंचायत प्रशासनास ङ्गार मोलाच असं मार्गदर्शन नेहमीच लाभलं आहे.तसेच या टीमने धामना धरणातील जुनी पाईपलाईन दुरस्त करून पिंपळगाव रेणुकाई येथील गावाला पाणीपुरवठा सूरळीत चालू केला. आहे शेलूद येथील धामना धरणातुन पिंपळगाव रेणुकाई येथे गावक-यांना 10 वर्षापासुन पाणीपुरवठा बंद होता. शेलुद ते पिंपळगाव रेणुकाई ही पाईपलाईन खराब झाली असल्या कारणांमुळे पिंपळगाव रेणुकाई येथे पाणी येत नव्हते .व त्यानंतर तसेच जुई धरणातुन पिंपळगाव रेणुकाईला पाणि पुरवठा केला जात होता. पण लाईनच्या लोडसेंटिगमुळे गावाला वेळेवर पाणी मिळत नाही . त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई गावाला पाणी टंचाईचा सामणा करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी पाणी टंचाई निमित्ताने काही मुस्लिम महिलानी ग्रामपंचायतवर हंडामोर्चा काढला होता .त्यामुळे ग्रामपंचायतने लक्ष घालुन शेलुद येथील धामानाधरनातुन पिंपळगाव रेणुकाई येथे अलेल्या पाईपलाईन दुरस्त करून व परिसरात एक विहीर अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत केला. पिंपळगाव रेणुकाई येथे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले असून उन्हाच्या वाढत्या तापमानाने विहिरींनी तळ गाठला आहे. या पाईपलाईने पाणी सोडल्यास नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. सद्यस्थितीत सदरील गावकर्यांना कोरोना संकटाच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागतली असती. येत्या काळात पाणी न सोडल्यास या गावाला टँकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय उरला नसता. पिंपळगाव रेणुकाई गावाला पाणी मिळावे म्हणून ग्रापंयतने लवकारात लवकर गावक-याना पाणी मिळावे म्हणून पाईपलाईनचे काम हातीघेवुन लवकर दुरस्ती केले व आता तिसर्या दिवशी पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा चालू केला असताना उपस्थित भा.ज .पा.तालुका अधक्ष राजेंद्र देशमुख्. समाधान देशमुख , ग्रामविकास अधिकार ए्.आर.काकडे व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment