पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई.वालसांवगी. पारध. सावंगी् (आवघडराव) परिसरात अगदी बोटांवर मोजण्याइतके पानमळे शिल्लक आहेत. त्यातच आता कोरोनामुळे सर्वच पानमळ्यातील पानविक्री बंद असल्याने उत्पादक शेतकर्यांचे मोठे हाल व आर्थिक नुकसान होत आहे. कवडीमोल भाग, अस्मानी संकट, तर कधी रोगराई, गारपीट यामुळे हताश होऊन शेतकर्यांनी पानमळे काढून घेतले. आता अगदी बोटांवर मोजण्याइतके पानमळे शिल्लक आहेत. त्यातच आता कोरोनामुळे सर्वच पानमळ्यातील पानविक्री बंद असल्याने उत्पादक शेतकर्यांचे मोठे हाल व आर्थिक नुकसान होत आहे. येथील पानउत्पादक शेतकरी पानांचे पेटारे विक्रीसाठी नागपूर, भुसावळ, पुणे, येथे पाठवीत असत. ही पाने विकून त्यातून ते दोन पैसे कमवत; मात्र आता गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागवेली पानांची विक्री थांबली आहे, सर्व बाजार बंद आहे, निर्यात बंद आहे, त्यामुळे पानतांड्यात पाने तोडणीविना आहे. यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पानटपरीदेखील बंदच असल्यामुळे भोकरदन तालुक्यातील सावंगी (आवघडराव.)पारध. पिंपळगाव रेणुकाई.वालसावंगी भागात आजही मसाला पानाला, पानांचा विडा याला मागणी आहे, पानटपरी चालक हे पान तांड्यातून मोठ्या प्रमाणावर पाने विकत घेतात. यामुळे काहीप्रमाणात का होईना पानांची विक्री होत असे; मात्र आता तर पानटपर्यासुद्धा बंदच असल्याने पानांची विक्री तळत बंदच आहे. खर्च जास्त पानतांड्यात पाण्याचे नियोजन करणे, योग्य निगा राखणे, औषध ङ्गवारणी करणे, मजुरांकडून खुडई करून घेणे, शिवाय अन्य खर्च असा बराच खर्च पानतांड्याला येत असतो; मात्र आता विक्री बंद असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या मदतीची गरज वारंवार पानउत्पादक शेतकर्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावेच लागते आहे.रोगराई,वारा,वादळ, दुष्काळ,गारपीट,अतिवृष्ठी,कवडी
Leave a comment