सोयगाव । वार्ताहर

कंकराळा ता.सोयगाव शिवारातील गट नं.83 मधे मेणगाव धरणातुन 15 वर्षा पुर्वी मयत पदमसिंग राजपुत यानी पाईप लाईन केलेली असुन, आरोपी माळेगाव येथील शेतकरी यांनी हाच पाईपलाईन सामुदाईक वापरासाठी भाड्या पोटी पैसे दिले होते.पाईपलाईन चा उपयोग घेतांना धरणात असलेली ईलेक्ट्रानिक मोटारजळाल्याने याचा दुरुस्ती चा निम्मा खर्च देण्याचा तगादा दि.22 शुक्रवारी लावला यातुन वाद उदभवला त्यातच कंकराळा येथील शेतक-याला पाय धरुन वर उचलत सिमेंट च्या रस्त्यावर दोन तीन वेळा आपटे असता त्यास जखमी अवस्थेत पुढील उपचाराठी जळगाव नेत असतांना मृत्यू झाला.या प्रकरणी सोयगाव पोलीसांनी एकाच कुटूंबातील  चार ईसमांना अटक करुन दि.23 शनिवारी  न्यायालयात हजर केले असता त्यांना तिन दिवस पोलीस ठोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असुन यातील कंकराळा येथील आरोपी फरार झाला आहे.

पदमसिंग महारु राजपुत असे मयत शेतक-याचे नाव आहे.माळेगाव संजय धना परदेशी,अमोल धना परदेशी,सागर संजय परदेशीसुनिल संजय परदेशी व संग्राम ईश्वसिंग परदेशी अशी आरोपींची नावे आहेत.मयत शेतकरी पदमसिंग राजपूत यांच्या शेतीलाच लागुन आरोपींची शेती आहे.या दोघामध्ये मेणगाव स्थित धरणावररुन पाईप लाईन व्दारे सामुदाईक पाईप लाईन वरुन पाळी पाळीने शेती पिकांसाठी पाणी घेण्याचा तोडी करार झालेला होता.दरम्यान आरोपी ची पाळी असतांना या पाईपलाईन वरची ईलेक्ट्रानिक मोटार जळाली असता कंकराळा येथे मयताच्या घरासमोर याचा दुरुस्तीचा निम्मा खर्च द्यावा म्हनुण वाद झाला. वाद चिघळला असता या वादात आरोपींनी पदमसिंग राजपुत यांचे पाय धरुन दोन ते तीन वेळा जमीनीवरील सिमेंट रस्त्यावर वर उचलुन आपटल्याने ते जबर जखमी झाले.दरम्यान आरोपी शिवीगाळ करत पळुन गेले,पदमसिंग राजपुत यांना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आनले असता त्यांचेवर प्राथमिक उपचार करण्यात आले.मात्र डोक्याला मोठ्या प्रमामात ईजा झाल्याने त्यांना पुढील उपचार कामी जळगाव येथील शासकीय सामाण्य रुग्णालयात नेत असतांना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.जळगाव येथील डॉक्टरांनी तपासणी करुन शेतकरी पदमसिंग राजपुत मयत झाल्याचे सांगीतले शुक्रवारी जळगाव येथेच पोस्ट माटम करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.रात्री उशीरा अंत विधी करण्यात आला.व सोयगाव पोलीसात मयत शेतक-याचा मुलगा जयसिंग पदमसिग यांच्या फिर्यादीवरुन संजय परदेशी,अमोल परदेशी, सागर परदेशी, सुनिल परदेशी सर्व रा.माळेगाव व संग्राम ईश्वर परदेशी याचे विरुध्ध भादवि 302/143/147/149/323/504/506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील माळेगाव येथील चार आरोपींना सोयगाव पोलीसांनी ताब्यात घेवून न्यायालयाल दि.23 हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेेेेश न्यायालयाने दिले आहेत. कंकराळा येथाल ईश्वर परदेशी हा फरार होण्या यशस्वी झाला असुन त्याचा शोध सोयगाव पोलीसाकडुन घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास औरंगाबाद पोलीस अधिक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील,उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनात सहा. सुदाम सिरसाठ,पोहेका सतोष पाईकराव,सागर गायकवाड,दिलीप तडवी,रविंद्र तायडे, आदी करीत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.