औरंगाबाद । वार्ताहर
सिल्क मिल परिसरात कोरोनाचा प्रसार होऊ नये, लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती व्हावी, यासाठी येथील लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करण्यात शासनाची सर्व यंत्रणा यशस्वी झाल्याची माहिती अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी आज दिली.
सुरुवातीला सिल्क मिल परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. यामध्ये विशेषत्वाने तरुणांचा सहभाग अधिक होता. ’जाने दो साहब...कुछ नहीं होता’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्यात अनेक समज, गैरसमज होते. ते आमच्या पथकाने दूर केले. आता दररोज गस्ती पथक या भागामध्ये भेट देत आहे. काहींचा विरोध अजूनही जानवतो, पण त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती त्यांना व इतर नागरिकांनाही देतो. आता या भागातील लोकांमध्ये कोरोना विषाणूपासून होणार्या संसर्गाबाबत जागृती निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत, त्याचा आम्हालाही आनंद आहे, असे मतही डॉ.फड यांनी व्यक्त केले.
भागातील 34 वर्षीय इम्रान खान ऊर्फ बबलू म्हणतात, आमचा भाग कंटेंटमेंट झोनमध्ये असल्याने येथे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाचे आम्हाला भरपूर सहकार्य मिळाले. येथे तैनात करण्यात आलेल्या पथकाचे अधिकारी, कर्मचारी दररोज गलोगल्लीमध्ये येऊन जागृती करते आहेत. त्याचा खूप चांगला परिणाम आता दिसून येत आहे. तर 32 वर्षीय सिराज पठाण म्हणाले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पथकाकडून कोरोनच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी, खबरदारी याबाबत मेगाफोनच्या माध्यमातून आमच्या परिसरात अधिकारी, कर्मचारी माहिती देतात. त्या माहितीमुळे कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मोठ्याप्रमाणात उपयोग होतो, असेही ते म्हणाले. या डॉ. फड यांच्या पथकात नेतृत्त्वाखाली सह समन्वय अधिकारी म्हणून श्रीकांत देशपांडे, नोडल अधिकारी म्हणून विजय महाजन, सहायक नोडल अधिकारी वैभव पाटील, सहायक नोडल अधिकारी अभय करमरकर, सहायक नोडल अधिकारी सुनील अत्रे, गस्त अधिकारी जी.व्ही. गाडेकर, एस.एच. देवरे, एस.एच. सोनवणे, डी.डी.सूर्यवंशी, एस.डब्ल्यू. सरकटे, एन.जी. मोदी, भास्कर पाटील, एस.व्ही.अंबेकर, शेख रफीक आदी कामगिरी बजावत आहेत.
Leave a comment