औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढू नये यादृष्टीने ग्रामीण भागातील प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी 26 मे रोजी जिल्हा परिषद आपल्या गावी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे. या दिवशी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती पदाधिकारी सदर उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होणार आहे. तसेच सर्व विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कर्मचारी, सर्व पंचायत समिती गणाचे संपर्क अधिकारी ग्राम पंचायतिला भेटी देतील. सदर भेटीदरम्यान सर्व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांनी त्यांच्या ग्राम पंचायतीमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे.
यामध्ये पंचायत समिती गणाचे संपर्क अधिकारी त्यांच्या गणातील 100 टक्के ग्राम पंचायतींना भेटी देतील. तालुका संपर्क अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद विभाग प्रमुख, पंचायत समिती विभाग प्रमुख यांनी तालुक्यातील कोणत्याही 10 ग्राम पंचायतीला भेटी द्याव्यात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना देखील भेटी द्याव्यात. या भेटी दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करून विहित नमुन्यात अहवाल सादर करावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी सूचित केले आहे.
Leave a comment