औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाच्या संबधाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले भेटी देत असून, 23 मे रोजी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंप्रीराजा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध औषध साठा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच कोविड 19 बद्दल कर्मचार्याना मार्गदर्शन केले व दैनदिन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण आयुर्वेद येथील कोविड सेंटर ला त्यांनी यावेळी भेट दिली. त्याठिकाणी गट विकास अधिकारी श्री एम सी राठोड, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुनंदा मदगे, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंप्रीराजा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ रुबिना शेख, डॉ वाहूळ, श्रीमती गोंडाणे तसेच आरोग्य कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत ग्रामीण भागात कोविड 19 च्या सर्वेक्षनासाठी 23 मे रोजी एकूण 87 टीम कार्यरत करण्यात आलेल्या असून त्यांनी आजपर्यत 3786 घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये आज एकूण 531 रुग्णांची वैद्यकीय अधिकार्यांमार्फत तपासणी करण्यात आलेली आहे. त्यात 1 रुग्ण पोझीटीव्ह आढळला असून आतापर्यत एकूण 63 लोकांना होम क़्वारटाईन केलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आशा व अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत कोरोना आजाराबाबत माहिती देण्यात येत असून त्यापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती घरोघरी जावून तसेच हँडबिल्स वाटप करून देण्यात येत आहे. आरोग्य विभाग व जिल्हा परिषद औरंगाबाद प्रशासन कोविड 19 शी लढण्यास सज्ज असून लोकांनी घाबरून जावू नये व शासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणार्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
Leave a comment