पैठण । वार्ताहर
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षनात घनकचरामुक्त शहरांमध्ये पैठण नगरपरिषदला एक तारांकित मानांकन मिळाले असून पैठण नगर परिषदेला दुसर्यांदा हे मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाच्या नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2018 पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो. वर्ष 2019-20 साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहरांचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्रातील 76 शहरांनी बाजी मारली आहे. देशभरातील 70 शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील 41 शहरांत पैठण नगरपरिषद चा समावेश आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापनात पैठण नगर परिषद ने उत्कृष्ट काम केले आहे.घरोघरी जाऊन स्वच्छता विभागाने सुका कचरा व ओला कचरा घंटागाडी द्वारे संकलित करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली आहे. शहरात प्रत्येक प्रभागात सकाळी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने नागरिकात सुद्धा स्वच्छते विषयी आवड निर्माण झाली होती. नागरिकांनीही या स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे अशी माहिती नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी दिली आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणार्या एकूण गुणांपैकी 25 टक्के म्हणजे 6000 पैकी 1500 गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्त्व आहे अशी माहिती नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी दिली आहे.स्वच्छता अभियान राबविण्यात उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी मुख्यधिकारी सोमनाथ जाधव,स्वच्छता विभागाचे अधिकारी,कर्मचारी,नगर सेवक यांनी खूप परिश्रम घेतले असल्याने तसेच नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश मिळाले आहे असे नगराध्यक्ष लोळगे यांनी सांगितले आहे.
Leave a comment