आधी खड्डेमुक्तिसाठी 60 लाखांचा चुराडा, नंतर 3 कोटी 85 लाख मंजूर
शिवना । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरातील रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गुण नियंत्रण पथकाचा अहवाल दडपुन वापरण्यात येणारा दगड व खडी निकृष्ट असल्यामुळे नवा डांबरी करण रस्ता किती काळ टिकेल याची खात्री नाही. यासंदर्भात फोनवरून तसेच लेखी तक्रारी देऊनही आमच्याकडे दुसरी कामे असल्याचा उलट जबाब बांधकाम अधिकार्यांनी देऊन जबाबदारी झटकली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व टेकेदारच्या संगनमताने हे काम सुरू असल्याचा आरोप विध्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश काळे यांनी केला आहे.
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, धोत्रा, शिवना, वडाळी, रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. खड्डेमुक्तित साठ लाखांचा चुराडा केल्यानंतर पाठोपाठ तुकडे पाडून नवीन काम सुरु केले आहे. त्यासाठी 3 कोटी 85 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. एवढा अमाप निधी प्राप्त होऊनही रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारलेला नाही. काळे यांनी अंदाजपत्रक मागविले पण आज उद्या देतो म्हणून अधिकारी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसापूर्वी निकृष्ट कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी अडवणुक केली. परंतु पुन्हा परिस्थिती जैसेथे झाली. डांबराचा अभाव असल्यामुळे खडी आताच उचकुटू लागली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा तयार होणारा रस्ता खड्यात जाणारा आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. बी. मराठे यांना गुणवत्ते संबंधी माहिती दिली. त्यांनी मला एकाच काम असते का म्हणून जबाबदारी झटकली विध्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस निलेश काळे म्हणाले की हा रस्ता असाच झाला तर तो टिकणार नाही आणि पुन्हा एवढा निधी यासाठी मिळणार नाही. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. भगत यांच्याकडे तक्रार दिली आहे.
अधिकारी फिरकत नाही...
कामाच्या ठिकाणी अधिकारी भेटी देत नसल्यामुळे आधीच्या साठ लाखांचा चुराडा झाला. आता सुरू असलेल्या कामात डांबराचा वापर अत्यंत कमी आहे. व साईट पंख्याना मातीचा भराव करत आहे. त्या कामात कुठलाही नियम पाळला जात नाही उलट अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करत काम व्यवस्थित सुरू असल्याचे सांगतात. म्हणुन पुन्हा कोट्यवधी रुपयांचा चुराडा होण्याची शक्यता आहे.
निलेश काळे :- विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस
Leave a comment