मंठा । वार्ताहर
मंठा तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांचा कापूस विक्री करणे शिल्लक असून येथील सुरू असलेल्या सी.सी.आय केंद्रांमधून अगदी धिम्या गतीने कापूस खरेदी सुरू असल्यामुळे शेतकर्यांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. शेतकर्यांची अडचण दूर करण्यासाठी केंद्र मार्फत होणार्या कापूस खरेदीचा वेग वाढवणे गरजेचे असून आणखी दोन खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
आज मितीस दहा ते बारा शेतकर्यांचा कापूस खरेदी होत असल्यामुळे अनेक शेतकर्यांना ताटकळत बसावे लागत आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सीसीआय केंद्रांच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवण्यात आले असून यामध्ये कापूस खरेदीचा वेग वाढवून शेतकर्यांची अडचण दूर करण्याच्या सूचना करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे, उपसभापती राजेश मोरे, सचिव एस.एम.छनवाल यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment