पारध पोलीसांनी दुचाकी सह लाखोचा मुद्देमाल केला जप्त
लेहा । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस ठाणे अंतर्गत दि. 24 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे पोलीस ठाणे पारध यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की बुलढाणा जिल्हा धाड येथील परवानाधारक दुकानातून देशी दारूच्या मालाची चोरटी वाहतूक मोटर सायकलवरून करणार आहे यावरून पोलीस अधीक्षक जालना एस.चैतन्य पोलीस पवार सो मा उपविवो जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली बातमीची ठिकाणी सपोनि पोलीस शंकर शिंदे, उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सरडे, नीलेश खरात, सुरेश पाटील, नागरे जीवन बालके समाधान वाघ विकास जाधव होमगार्ड अविनाश थोटे यांची टीम तयार करून मिळालेल्या बातमीनुसार ठिकाणी अवघडराव सांगी ते पिंपळगाव रेणुकाई जाणारे रोडवर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील मोहन भिका कोठे यांच्या शेताच्या बाजूला अवघडराव सावंगी येथे एका मागोमाग एक मोटर सायकल व त्यावरून दारूची गोणी वायरची पिशवी ढीगांमध्ये पाठीवरील साक स्वरूपाची देशी दारूचा मोठ्या प्रमाणात मल मिळून आला.
सदरील आरोपी हे वडजी तालुका जिल्हा जळगाव पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जळगाव सपकाळ तालुका भोकरदन वाकडी तालुका भोकरदन सिल्लोड जिल्हा औरंगाबाद भोकरदन आणि डोंगरगाव ताडकळस वानवडोद शेलुद वालसावंगी इत्यादी ठिकाणचे एकूण एकवीस आरोपी मिळून आले असून त्यामध्ये काही जालना जिल्ह्यातील तर काही बाहेरील जिल्ह्यातील आरोपी जवळ कोकण देशी दारूच्या वेगळ्याच असलेल्या 750 देशी दारूच्या बाटल्या 72 हजार रुपये किमतीचा व 12 मोटरसायकली तीन लाख रुपये असा एकूण 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आला आहे सदर मिळून आलेल्याआरोपी त्यांना मालक कोठून हाणल याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दहाड जिल्हा बुलढाणा येथील परवानाधारक दुकानातून देशी दारू चामाल आणल्याची कबुली दिली आहे त्यावरून त्यावरून सर्व आरोपी विरोधात पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सरडे हे करीत आहे.
Leave a comment