बारा वर्षीय वरुण गौड याने केली टाकाऊ वस्तूंपासून उपक्रमशिल यंत्रणाची बांधणी

जालना । वार्ताहर

म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, अगदी अशीच कृती वरुण राजकुमार गौड याचीही आहे. अगदी लहानपणापासूनच त्याला टाकाऊ वस्तूंंपासून विविध प्रकारचे यंत्र बनवण्याची कला अवगत झाली आहे. सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे जो तो सॅनिटायझरचा वापर करु लागला आहे. परंतू बाटली विकत घेऊन ती हातावर रिचवण्याऐवजी बाटली पुढे हात नेला कीच हातावर सॅनिटायझर पडण्याची अफलातून मशिन वरुण गौड याने तयार केली असून त्याच्या या उपक्रमाचे कौतुक होऊ लागले आहे.जालन्यातील आरएचव्ही शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अवघ्या बारा वर्षाच्या वरुण गौड  यास अगदीच लहान पणापासून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा छंद जडलेला आहे. त्याने यापूर्वी  अशी एक गण तयार केली की, माणूस त्या गणच्या समोर आला की त्या गण मधून गोळी सुटून ती त्या माणसाला लागल्याशिवाय राहात नाही. त्याने नंतर त्याने पाण्याची टाकी भरल्यानंतर बर्‍याचवेळा मोटार बंद करायची राहून जाते  त्यामुळे पाणी वाया देखील जात असते. परंतू यावर उपाय म्हणून वरुण गौड याने पाण्याची टाकी भरली की लागलीच  सायरन (बेल) वाजतो आणि टाकी पाण्याने भरल्याचे आपणास कळते. त्यामुळे पाणी बचतीचा मार्ग शोधून काढणार्‍या  वरुण गौड याच्यावर त्यावेळीही अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. आता कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे लोकांना सॅनिटाझयरचे महत्व लक्षात आले असले तरी बाटलीतून रिचवून घेण्याऐवजी फक्त मशिनपुढील बाटलीजवळ हात नेला कीच हातावर सॅनिटायझर पडते आणि हात काढून घेतला की मशिन आपोआप बंद होते. घरातील टाकाऊ असलेल्या सुमारे आठ वस्तूंपासून वरुण गौड याने ही मशिन तयार केली आहे. या मशिनसाठी त्याने सेंसर, छोटीशी बॅटरी, स्वीच आदी आठ प्रकारच्या टाकाऊ असलेल्या वस्तूपासून त्याने हे उपकरण तयार केले आहे. 

अगदीच लहानपणापासूनच त्याला अशा प्रकारच्या टाकाऊ वस्तूंपासून काही तरी नवीन तयार करण्याचा छंद आहे. अभ्यासात निपून असलेल्या वरुण गौड यास अगाध बुध्दीमत्ताही प्राप्त झालेली आहे. टीव्हीवरील बातम्यांव्यतिरिक्त त्यास डिस्कव्हरी चॅनलची आवड असून या चॅनेलपासून बरेच काही शिकायला मिळत असल्याचे तो सांगतो. आपल्या उपक्रमास प्रारंभी घरच्यांकडून साथ मिळत नव्हती मात्र आपला उद्देश चांगला असल्यामुळे आता प्रोत्साहन मिळू लागल्याचेही वरुण गौड याने यावेळी सांंगितले. वरुण गौड याच्या या उपक्रमास मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी पाहणी केल्यानंतर वरुण गौड याचा पुष्पहार देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी डॉ.नंदकिशोर गौड, राजकुमार गौड, डॉ. गौरी गौड, कचरु गौड आदींची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.