कुंभार पिंपळगाव सीसीआय कापुस खरेदी केंद्रावर रोज 70 वाहनांची मोजणी करण्याचे दिले आदेश
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव कापूस खरेदी केंद्राला जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ता.24 रविवार रोजी दुपारी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेऊन खरेदीची वेग वाढवावा असे सांगण्यात आले पिंपळगाव सह परिसरातील बहुतांश शेतकर्यांचा कापूस घरात पडून आहे कापूस खरेदी केंद्रावर गर्दी कमी होत नसल्याने व कापूस मोजणीची वेग धिम्या गतीने होत असल्याने शेतकर्यांना खाजगीत 1000 ते 1500 एक हजार ते दीड हजार रुपये नुकसान सहन करून गोदाकाठच्या शेतकर्यांना कापूस विकावा लागत आहे. परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्यांनी कापूस खरेदीची गती वाढवावी म्हणून वारंवार मागणी केली होती. त्या अनुषंगाने आमदार राजेश टोपे यांनी कुंभार पिंपळगाव येथील सीसीआय कापुस खरेदी केंद्र मिनाक्षी फायबर मिनिंग या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली .व कापूस खरेदी केंद्र प्रमुख पवन बोबडे यांच्याशी चर्चा करून तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या मला सांगा माझ्याकडून पाहिजे ती मदत मी करायला तयार आहे असे त्यांनी यावेळी विश्वास दिला व खरेदीची गती वाढवून रोज 60 ते 70 शेतकर्यांच्या कापसाची मोजणी करा असा आदेश देण्यात आले.
आ.राजेश टोपे यांनी मीनाक्षी फायबर जिनिंगचे मालक विजय अग्रवाल यांना फोन संपर्क करून खरेदीचा वेग वाढवा माझ्याकडून पाहिजे ती मदत घ्या व अंबड घनसांगी तालुक्यातील माझ्या कापूस उत्पादक शेतकर्यांना कापूस शिल्लक राहिला नाही पाहिजे. खरेदीचा वेग वाढवा घनसावंगी तही एक कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार, घनसावंगी येथील खरेदीची नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सीसीआय कापूस खरेदीचे जिनिंग मालक त्यांच्याशी बोलताना सांगितले. यावेळी कृषी, महसूल मंडळ, सहकार, ग्रामविकास अधिकारी कृषी उत्तपन्न बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब उढाण, तहसिलदार गौरव खौरनार, बी.डी.ओ अंकुश गुंजकर, कृषी अधिकारी नित्यानंद काळे, मंडळ अधिकारी रामाजी घनवट, तलाठी, कृषी साह्यक एक.जी.सोनवणे सह आदिंची उपस्थिती होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सोशल डिस्टन्सिगंचा पडला विसर कापूस खरेदी केंद्र भेट दिली त्या वेळी सोशल डिस्टन्सिगंचा पाळण्यात आले नसल्याचे दिसून आले. परिसरातील कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
Leave a comment