शिवना वासीयांना मिळाला दिलासा
शिवना । वार्ताहर
कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना 22 पैकी 17 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने शिवना वासियांना दिलासा मिळाला आहे. अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेल्यांमध्ये 17 जण शिवना प्राथमीक आरोग्य केंद्रातील कर्मचारी होते.
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या एक वैद्यकीय अधिकार्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोमवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरात खळबळ उडाली होती. शिवना येथील एक वैद्यकीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच शिवण्यासह अनेक गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले व्यक्तींचे 22 पैकी 17 जणांचे लाळेचे नमुने सिल्लोड याठिकाणी गुरुवार(दि.21) रोजी दुपारी घेण्यात आले होते. त्यानंतर घाटी शासकीय महाविद्यालय औरंगाबाद याठिकाणी लाळेचे नमुने टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आले होते. तर 22 पैकी 17 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळताच शिवना वासियांनसह परिसरातील नागरिकांना दिलास मिळाला. तसेच पाच संशयितांचे लाळेचे नमुने शनिवार(दि.23) रोजी घेण्यात येणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी धनवट यांनी दिली...
Leave a comment