युवा नेते अब्दुल समीर यांच्या हस्ते उद्घाटन
सिल्लोड । वार्ताहर
शासनाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मका, ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन युवानेते अब्दुल समीर यांच्या हस्ते संपन्न झाले. या योजनेअंतर्गत शेतकर्यांकडे उपलब्ध असलेल्या एफ ए क्यू दर्जाची मका शासनाच्या आधारभूत किमतीने खरेदी केला जाणार असल्याने सिल्लोड तालुक्यातील मका उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मका उत्पादक शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी याप्रसंगी केले.
शनिवार ( दि. 23 ) रोजी शहरातील दूध डेरी जवळील खरेदी-विक्री संघाच्या गोडावूनमध्ये पिंपळगाव पेठ येथील शेतकरी नारायण पाटील भोसले यांच्या मका खरेदीने सिल्लोड येथे शासकीय भरड धान्य खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे ,सहाय्यक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे, पुरवठा नायब तहसीलदार संजय सोनवणे, कृउबा चे सभापती अर्जुन पाटील गाढे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश पाटील साळवे ,व्हाईस चेअरमन हनीफ मुलतानी, संचालक संजय पा. मुरकुटे, मनोज झंवर, बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण ,नगरसेवक प्रशांत शिरसागर, शेतकरी शंकर जाधव, फकीरा सुलेमान ,नारायण भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती.
Leave a comment