पाचोड । वार्ताहर
रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पाचोड पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.23 रोजी मुस्लिम बांधवांच्या शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ईद-उल-फित्रची नमाज आपापल्या घरातच साजरी करावी रमजान ईद सार्वजनिक ठिकाणी न साजरा करता आपल्या घरीच साजरा करावी असे आव्हान पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरक्ष भांबरे यांनी केले आहे.
यावेळी झालेल्या बैठकीला पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक युवराज शिंदे, गोपनीय शाखेचे भगवान धांडे ,नरेंद्र अंधारे, आडुळ चे सरपंच शेख नासेर ,मौलाना शब्बीर ,मौलाना जाकिर , मौलाना मुकिद, सय्यद शहादत ,अलीम बागवान ,कादर कुरेशी, मुनवर सय्यद ,कौसर पटेल, पत्रकार संघाचे शेख इरफान,मुक्तार शेख,शिवाजी पाचोडे,मुरलीधर निर्मळ,सिध्दार्थ मगर,सिराज सय्यद, आदी उपस्थित होते. यावेळी रमजान ईद संदर्भात चर्चा करण्यात आली सर्वानुमते (25.मे) रोजी रमजान ईद सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता आपापल्या घरातच साजरी करण्याचे ठरवण्यात आले घरीच ईद साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले .कोरोना विषाणूच्या सध्या महामारी चालू असून सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे. आव्हान उपविभागीय पोलिस अधिकारी गोरक्ष भांबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी केले तसेच पाचोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले
Leave a comment