लॉकडाऊनमुळे परराज्य व जिल्ह्यात अडकलेल्या अनेकांना येन्या जाण्यास केलि मदत
सिल्लोड । वार्ताहर
राज्यातील कोरोनाचा कहर जसा वाढत आहे तशी बाहेरगावी कामानिमित्त अडकलेल्या अनेकांना घरी जाता न आल्याची खंत व चिंताही वाढत आहे.सिल्लोड शहरातील हजारो नागरिक शिक्षण व नोकरी निमित्त बाहेर गावी स्थिरावले आहेत. बाहेर गावी असणार्या ,शिक्षण घेणार्या विद्दार्थी वर्गास जेवना पासुन ते राहण्या पर्यन्त अनेक असुविधानां तोंड द्यावे लागत आहे. असुरक्षित तेचि भावना त्यांच्या मनात घर करून होती.या व्यक्तिमुळे त्यांचे कुटुंबच तनावाखाली आली होती. मात्र नुकतेच राज्य व केंद्र शासनाने जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने या व्यक्तिना घरी जाने सुकर झाले आहे.
शासनाच्या या निर्णयास सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष किरण पा.पवार व उपक्रमशील, धडाडीच्या नगरसेविका अश्विनि पवार यांनी कल्पकतेची जोड़ देवून मोफत ई-पास ,सुकर प्रवास हा उपक्रम राबविन्यास सुरुवात केलि आहे.या अंतर्गत बाहेर गावी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित घरी आनने व शहरातून महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जावू इच्छीणार्या शाहरवासियांना मोठी मदत या उपक्रमाद्वारे होत आहे. जळगाव येथे आजिच्या दशक्रियेसाठी एका कुटुंबाला जाने याद्वारे साध्य झाले.यवतमाळ, पुणे आदी शहरात सासर असलेल्या महिलांना सुखरूप पोहचन्यास मदत झाली.मुंबई, पुणे,औरंगाबाद, धुळे, चिखली आदि ठिकानांहुन अनेक नागरिक सुखरुप परत आनने यामुळे शक्य झाले. आंध्रप्रदेश व मुंबई मधील अनेक नागरिक या माध्यमातुन दाखल झाले आहेत. महत्वाच्या कामासाठी परजिल्ह्यात जाण्यास या परवान्याची मौलिक सहकार्य मिळाले. किरण पवार यांनी आधी या पास धारकांची कोरोना सदृश्य लक्षणे नसल्याची वैद्यकीय तपासणी करवून घेतलि व त्याबाबतचे आवश्यक ते दाखले, प्रमाणपत्र मिळवून पुढील कार्यवाही केली. या सर्व ई--पास धारकांनी स्वतःची शासन दरबारी नोंद करून स्वतःस होम क्वारेंटाईन करून घेतले हे विशेष. शहरात आलेल्या या सर्वांची फोन वरुण आरोग्य विषयक विचारपुस व व्हीडियो कॉल करून ते घरीच थांबत आहे याची खातरजमाही हे दांपत्य करत आहे. संस्थेचे विजय चव्हाण व दिपक पाटील हे सदस्य संगणकीय बाजू सांभाळत याकामी महत्वाचे योगदान देत आहे.या सुविधेचा ईच्छुक व्यक्तिनि लाभ घ्यावा मात्र अत्यंत गरजेचे असेल तरच प्रवास करावा तसेच माहिति लपवू नये व होम क्वारेंटाईन रहावे, त्रास झाल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ज्यांना ई पासची आवश्यकता असेल त्यांनी अभिनव प्रतिष्ठान च्या 9420380038 क्रमांक वर संपर्क करावा.
Leave a comment