कृषी विभागाची कारवाई
औरंगाबाद । वार्ताहर
विहामांडवा तालुका पैठण येथील मे.दिपक कृषी सेवा केंद्र व मे. समर्थ कृषी सेवा केंद्र,यांचा विक्री परवाना निलंबित करण्यात आले असल्याचे कृषी अधिकारी यानी कळवले आहे.
खत निरीक्षक तथा गुणनियंत्रण निरीक्षक आशिष लक्ष्मीकांत काळुसे, विभागीय कृषी सहसंचालक , कार्यालय, औरंगाबाद व विकास एस पाटील खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती ,पैठण यांनी मे. दिपक कृषी सेवा केंद्र व मे. समर्थ कृषी सेवा केंद्र, विहामांडवा तालुका पैठण, येथे खते विक्री केंद्रात भेट देऊन तपासणी केली. त्यामध्ये खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदी व परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे खत नियंत्रण आदेश 1985 मधील कलम 8,कलम 4 कलम उ1.35 कलम 5,कलम उ1.35 (र) ,कलमउ1.3(3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी विक्रेत्याचे विक्री परवाना दिनांक 19.5.2020 पासून निलंबित करण्यात आले असल्याचे कृषी अधिकारी यानी कळवले आहे.
Leave a comment