सोयगाव वनपरिक्षेत्राची कारवाई
सोयगाव । वार्ताहर
सोयगाव वनपरिक्षेत्रात लाकूड तस्करीकरीता कुख्यात व अतिसंवेदशील असणार्या नानेगाव व जंजाळा या भागात लॉकडाऊनच्या काळात सोयगाव वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचार्यांची नियमित गस्त सुरू आहे. याच गस्ती दरम्यान दि.22 शनिवार रोजी पहाटे 4 ते 4:30 वा. च्या दरम्यान एक वाहन नानेगाव ते अंभई या रस्त्याने संशयास्पद स्थितीत येत असताना वनाधिकार्यांना आढळून आले. वनाधिकार्यांना पाहताच लाकूड तस्कर वाहन जागेवरच थांबवून घटनास्थळावरून पसार झाले. वनाधिकार्यांनी वाहनाची (एम.एच- 20 ई.जी. 7620) ढरींर चरसळल ळिलज्ञ र्ीि पाहणी केली असता त्यात रूपांतरित सागवान चिराण माल आढळून आला. तदनंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता वनाधिकार्यांनी सदरील वनोपज वाहनासहित जप्त करून सोयगाव याठिकाणी आणला..
सदर मालाची मोजणी केली असता त्यात रूपांतरित सागवान मालाचे 16 नग, 0.536 घ.मी एवढा वनोपज आढळला असून त्याची शासकीय किंमत रूपये 44176 /- आहे.. मागील महीनाभरातील ही तीसरी कारवाई असून त्यामुळे वनतस्कराचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाई मा. उपवनसंरक्षक एस.पी. वडस्कर व सहाय्यक वनसंरक्षक डी. आर . वाकचौरे यांच्या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आर. एस. साळवे, वनरक्षक आर.जी. गायकवाड, वनसेवक बापू आप्पा ज्ञाने, काशिनाथ कोठाळे या पथकाने केली.
Leave a comment