मंठा । वार्ताहर
मंठा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महसुल, आरोग्य विभागाबरोबर नगर पंचायत प्रशासनाने दिवस-रात्र मेहनत घेऊन आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसह व्यापार्यांनी कृतज्ञता व्यक्त फुलांचा वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले.
कोरोना पार्श्वभूमीवर बदलेले नियम व जनजागृती करण्यासाठी संयुक्तिकरित्या मोहीम राबविण्यात येत असुन प्रशासन आपल्या सोबत आहे, यापुढे ही सहकार्य करावे. यावेळी तहसीलदार सुमन मोरे, पोलीस निरीक्षक विलास निकम, मुख्याधिकारी सतिश कुलकर्णी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चाटसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे, फौजदार नितिन गट्टुवार, विजय जाधव यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. मुख्य रस्त्यावरून काढलेल्या या फेरीत परिसरातील नागरिकांसह व्यापार्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले. मुख्य व अंतर्गत रस्त्यासह चौकाचौकांत नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत टाळ्या वाजवून प्रशासन विषयी कृतज्ञता व्यक्त केली. कोरोना व्हायरसचे बाधित रुग्ण वाढत असताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.यापुढेही व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने घालुन दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी.यात शहरात कामाशिवाय व मास्कविना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच व्यापार्यांनी आपल्या दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नये. तसेच नागरिकांनी रस्त्यावर इतरत्र कोठेही गर्दी करू नये, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. प्रशासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी केले आहे.
Leave a comment