तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे भारतीय जनता पार्टी घनसावंगी तालुक्याच्या भ वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करून निषेध आंदोलन करण्यात आले,शेतकर्यांना आर्थिक पॅकेज घोषित करा, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, कामगार, घर कामगार, बारा बलुतेदारांना घरपोच आर्थिक मदत करा, आधारभूत किमती वर धान्य खरेदी चालू करा, सरसकट संपूर्ण कर्जमाङ्गी लागू करा व वीज बिल माङ्ग करा, शाळेची ङ्गी रद्द करा, शिधापत्रिका नसल्यातरी धान्य द्या व शिधापत्रिकेवर साखर, किराणा, डाळ देण्यास सुरुवात करा, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या मोङ्गत प्रवासाची सोय करा,खाजगी रुग्णालयात सर्वांना उपचार मोङ्गत करा व संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे पैसे त्वरित द्या, शेतकर्यांना बी-बियाणे खते मोङ्गत उपलब्ध करून द्या, शेतकर्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्या व जास्तीत जास्त कापूस खरेदी केंद्र उघडून शेतकर्यांचा कापूस खरेदी करा कुठलीही अट न पाहता सगळ्या शेतकर्यांना पीक कर्ज द्या,इत्यादी मागण्या करिता राज्य शासनाचा निषेध म्हणून आज आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी भाजपा चे घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे,तात्यासाहेब चिमणे,अंकुशराव बोबडे,शेषनारायण मापारे,अण्णा बोबडे,भरत परदेशी,अर्जुन त्रिसुळे,डिगांबर चिमणे,दत्ता पाटील चिमणे,नारायण बोबडे,आदिसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment