माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल। 

जालना । वार्ताहर

महाराष्ट्राचे सक्षम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व पोलीस यंत्रणेतील सर्व कोरोना योध्दे दिवस - राञ रक्ताचे पाणी करून महाराष्ट्रास  कोरोना मुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर लढा देत असतांना या लढाईत राज्य शासनास साथ देण्याऐवजी कोरोना पेक्षा महाभयंकर असा काळा व्हायरस निर्माण झाला असून जनतेने  या व्हायरस पासून बचाव करावा. अशा शब्दांत शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.  तथापि आंदोलन करणारे अंगणात तुळशी ऐवजी भांग पेरत असल्याचे सिद्ध झाले असून जनतेने त्यांचे आंदोलनच निष्प्रभ  केल्याचे स्पष्ट झाले असे रोख - ठोक मत ही अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केले.

स्टंट बाजी आणि सोहळे साजरे करण्यात माहीर असलेल्या विरोधकांना  कोरोना संसर्गजन्य आजाराने उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या काळात सोहळ्याचे विषय संपल्यानंतर खरे रूप दाखवण्याची उसंत मिळाली.असे सांगून अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले, गत दोन महिन्यांत लॉकडाऊन च्या संकटामुळे  आर्थिक अडचणीत सापडलेल्या  राज्यास मदत करण्या ऐवजी महाराष्ट्र द्वेष्ट्या प्रवृतींनी राज्य शासनास दमडी ची ही मदत न करता केंद्राकडे सर्व  मदत निधी पाठवला. यातून त्यांची  मायभूमी प्रती असलेली निष्ठा व येथील नागरिकांप्रती असलेली सहानुभूती दिसून आली.  असे नमूद करत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले, लॉकडाऊन च्या संकटात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाशी  लढण्याकरिता केंद्राकडून भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून बारा बलुतेदारांना  भडकवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. संकटकाळात  राजकारणाच्या पोळ्या भाजणार्‍या काळ्या व्हायरस ला येथील जनता  अंगणातही  उभे न करता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साथ देऊन महाराष्ट्र वाचवेल असा विश्‍वास ही माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.