जालना । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन रांगोळी, चित्रकला स्पर्धेतून कोरोना योद्ध्यांना अभिवादन करण्यात आले. संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्यावतीने कोरोना टाळेबंदीत वर्क ङ्ग्रॉम होम यातून ज्ञानार्जना बरोबरच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे छंद जोपासावेत याच हेतूने ऑनलाईन रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर), परिचारिका (नर्स), कर्तव्यदक्ष पोलीस दादा या विषयावर रांगोळी, चित्र काढण्याचे सांगण्यात आले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
कोरोना महासंकटात योध्या सारखे कार्य करणार्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस दादा यांना रांगोळी आणि चित्राद्वारे अभिवादन करण्यात आले. ऑनलाइन अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे विविध छंद जोपासण्याचे कार्य सुरू आहे. या स्पर्धेत एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. रांगोळी स्पर्धेत प्रथम पायल अंबेकर, द्वितीय तनवी भालेराव, तृतीय प्रांजल रांजणकर तर चित्रकला स्पर्धेत प्रथम सुवर्णा पाडळे, द्वितीय आदर्श जटाळे, तृतीय आकांक्षा पवार या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक संतोष जोशी, अरविंद देशपांडे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन उपक्रमशिल शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी केले होते. शाळेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, विनायकराव देशपांडे, प्रा.राम भाले,प्रा. केशरसिंह बगेरिया, रणजित ठाकूर,डॉ.जुगल किशोर भाला, मुख्याध्यापक ईश्वर वाघ, किरण धुळे, श्रीमती रेखा हिवाळे, कीर्ती कागबट्टे,शिल्पा गऊळकर, रशिद तडवी, माणिक राठोड आदींसह सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
Leave a comment