जालना । वार्ताहर
कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या संकट काळात कामगार, गोर- गरीब व झोपडपट्टी भागात स्थित अडचणीत सापडलेल्या खर्या गरजवंतांना अंधकारमय परिस्थितीत आशेचा किरण म्हणून सरसावलेल्या नगरसेविका सौ. रेणुका महेश निक्कम यांनी सुरक्षेचे पालन करत स्वखर्चाने द्वारपोच धान्य वितरित करून दातृत्वाची ज्योत प्रज्वलित असल्याचे कृतीतून दाखवून दिले .असून खर्या गरजवंतांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्वतः अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून येत सर्वसाधारण कुटूंबात जीवन जगत असलेल्या जालना शहरातील प्रभाग क्रं. 10 च्या सर्वात तरुण नगरसेविका सौ.रेणुका महेश निक्कम ह्या प्रभागातील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करतात.नगरपालिकेच्या सभागृहात नागरी समस्यांवर आवाज उठविण्या सोबतच पती महेश निक्कम यांचे मार्गदर्शन व सहकार्याने त्यांनी संपूर्ण प्रभागात रस्ते, जलवाहिनी,पथदिवे, भुयारी गटार, स्वच्छता, ही कामे पूर्ण केली. लोकप्रतिनिधी या नात्याने ते आपले आद्य कर्तव्य आहे. असे सांगून रेणुका निक्कम म्हणाल्या, संकट काळात अडचणीत सापडलेल्या जनतेस धीर द्यावा ही शिकवण कुटूंबातून मिळाली. याच भावनेने गाजावाजा न करता लॉकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात प्रभागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण प्रभागात नियमीत स्वच्छता अधिक गतीमान करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 100 गरजवंत कुटूंबाना धान्य पुरवठा केला. मात्र आपल्या प्रभागात अनेक गरजवंत कुटूंब असल्याचे निदर्शनास आले .तेव्हा पती महेश निक्कम यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने एकूण 1600 कुटूंब जगविण्यासाठी पुढाकार घेतला. सामाजिक दायित्व म्हणून पतींनी मिञ व प्रभागातील स्वंयसेवी यांच्या सहकार्याने भवानी नगर, सिध्दीविनायक नगर येथील कुटूंबाना कोणाचीही आर्थिक वा अन्य कसली ही मदत न घेता आपल्या यथाशक्तीने सुरक्षित अंतराचे पालन करत धान्य पुरवठा केला. तथापि सधन असलेल्या योगेश्वरी नगर, तुलसी पार्क येथील कुटुंबांना ही धान्य देत गरजूंना वितरित करा. असे आवाहन केले. त्यास येथील नागरिकांनी उत्स्ङ्गुर्त प्रतिसाद दिला. असे सांगून रेणुका निक्कम म्हणाल्या, गरजवंतांच्या चेहर्या वरील समाधान पाहून आपणास नवी उर्जा मिळाली. असे नमूद करत लॉकडाऊन संपेपर्यंत नियमीत धान्य पुरवठा करण्याचा संकल्प केला .असल्याचे नगरसेविका सौ रेणुका निक्कम यांनी नमूद केले. दरम्यान कुठलीही सुबत्ता, राजकीय वारसा नसतांना रेणुका निक्कम यांनी राबवलेल्या उपक्रम गरजवंतांना मोठा दिलासा देणारा ठरला असून अनेकांनी या अभिनव उपक्रमाचे स्वंस्ङ्गुर्तीने स्वागत केले.
Leave a comment