मदतीसाठी शेतकरी प्रतिक्षेत
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
तालुक्यातील परिसरात मागच्या वर्षी पारध येथे सततच्या पावसामुळे रायघोळ नदीला आलेल्या पुरामुळे कडुबा देशमुख यांच्या नदीकाठच्या शेतात पडलेल्या मोठ्या खड्ड्याची अजुनही दुरुस्त नाही . दरम्यान या खड्ड्यामुळे परिसरातील 35 एकर शेती वाहुन जाण्याची भिती परिसरातील अनेक शेतकर्याने व्यक्त केलली आहे. भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात मागील वर्षी जोरदार पाऊस झाला होता.त्यामुळे पहिल्या पावसापासुन शेवटपर्यत रायघोळ नदीला सारखा पुर आल्याने पारध येथील शेतकर्यांच्या नदीकाठच्या जमीनी वाहुन गेल्या होत्या.त्यात भर म्हणजे पारध ते अवघडराव सावंगी मार्गावर असलेल्या नदीकाठच्या जमीनीला अक्षरश: एक मोठा भगदाड पडलेला होता.त्यामुळे येथील शेतकरी कडुबा देशमुख या शेतकर्यांचे कपासी पीक पूर्णतःवाहुन गेल्याने मोठे नुकसान झाले होते.विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही या शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणीही अधिकारी गेलेले नाही.
एकवेळ आमदार संतोष पाटील दानवे स्वता पाहणी करण्यासाठी आले होते.त्यानंतर कोणतेही आधिकारी पाहणी करण्यासाठी आले नाहीत. पावसामुळे मागील वर्षी माझ्या शेतातील कपासी पुर्ण वाहुन गेली होती.त्या झालेल्या नुकसानीचा मोबदला तर सोडाच परंतु त्या पुरामुळे पडलेला ङ्गार मोठा भगदाड सुद्धा शासनाने आजपर्यंत दाबला नाही. तर तो खड्डा असाच राहिला तर या पुढे येणार्या पावसाळ्यात माझी राहिलेली पुर्ण शेती वाहुन गेल्याशिवाय राहणार नाही ् त्यामुळे तो खड्डा दाबुन द्यावा व मागील वर्षी झालेली नुकसान भरपाई शासनाने भरुन द्यावी.असे येथील शेतकरी कडुबा देशमुख सह परिसरातील शेतकरी यांनी शासनाकडे मागणी केली आहे. मागच्या वर्षी रायघोळ नदीला सारखा पुर आल्यामुळे येथील शेतकरी कडुबा देशमुख यांची नदी काठी असलेली शेती वाहुन गेल्याने मोठे भगदाड पडलेले आहे.व परिसरातील 35 एकर शेती या पुरामुळे वाहुन गेली होती.कट्ट्या शेजारील पडलेला मोठा भगदाड शासनाने पाऊस सुरु होण्याअगोदर दाबावा.नाहीतर या ही वर्षी या पण खड्ड्यामुळे ङ्गार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे मत माजी सभापती परमेश्वर लोखंडे यांनी लोकमतला बोलताना व्यक्त केले .
Leave a comment